‘आई कुठं काय करते’ मधील अरुंधतीचा भाऊ सुधीर आहे ‘या’ दिग्गज अभिनेत्याचा मुलगा…

‘आई कुठं काय करते’ मधील अरुंधतीचा भाऊ सुधीर आहे ‘या’ दिग्गज अभिनेत्याचा मुलगा…

मनोरंजन

सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता चांगलीच वाढलेली बघायला मिळत आहे. अनेक मराठी मालिकांनी टीआरपीच्या बाबतीत नवीन विक्रम केले आहे आहेत. अनेक महिन्यांपासून देवमाणूस या मराठी मालिकेने आपले अव्वल स्थान जपून ठेवले होते. मात्र आता देवमाणूसच्या टीआरपीच्या रँकिंग मध्ये घसरण झाली आहे.

एका मालिकेने सध्या राज्यातही सर्वच कुटुंबाना, भावुक करत पाहिलं स्थान प्राप्त केलं आहे. आई कुठं काय करते, या मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत बाकी सर्वच मालिकांना आता माघे टाकले आहे. अल्पावधीतच या मालिकेने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.आणि सध्या तर या मालिकेने संपूर्ण राज्यालाच वेड लावलं आहे.

अरुंधतीचा संघर्ष बघून सर्वच, महिला चांगल्याच भावुक झाल्या आहेत. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, गौरी, अभिषेक, यश, असे सर्वच पात्र चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेत आता अरुंधती आणि अनिरुद्धच्या घ’टस्फो’ट झाला आहे.

आई म्हणजेच अरुंधती आपलं घर सोडून जातानाचा एपिसोड बघताना सर्वांचेच डोळे पाणावले.आता अरुंधती आपल्या माहेरी आपल्या आई आणि भावासोबत राहताना दिसणार आहे. इतके दिवस केवळ दोन किंवा तीनच वेळेस अरुंधतीच्या आईला आणि भावाला दाखवण्यात आले होते.

प्रसिद्ध हिंदी मालिका ये रिश्ता क्या केहलता है मध्ये भाभी माँची भूमिका साकारणाऱ्या मेधा सांबूतकर, आई कुठं काय करते मध्ये अरुंधतीच्या आईची भूमिका साकारत आहेत तर केदार शिर्सेकर तिच्या भावाची भूमिका साकारत आहे. हा केदार दुसरा कोणी नसून प्रसिद्ध मराठी कलाकार’ शशिकांत शिर्सेकर’ यांचा मुलगा आहे. कमाल माझ्या बायकोची, सासरचं धोतर, नवरा बायको, वाहिनीची माया यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

त्याचसोबत अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये देखील शशिकांत यांनी काम केले आहे. केदार नेहमीच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या नाटकाच्या तालिमी बघायला जात असे. अनेकवेळा, सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी देखील केदार त्यांच्यासोबतच असे. त्यातूनच केदार यांनादेखील अभिनयाची आवड निर्माण झाली.

केदार शिर्सेकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली. वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी त्यांनी शकुंतला नाटकामध्ये काम केले. पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही काळ अभिनय करायचे थांबवले. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी अभिनयाची वाट धरली. दांडेकरांचा सल्ला, सही रे सही अशा नाटकांमध्ये त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या होत्या.

अनेक मराठी मालिकांमध्ये अधून मधून ते झळकतच असतात. सध्या आई कुठं काय करते, या मालिकेत त्यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. याआधी एक होती राजकन्या, प्रेम पॉइजन आणि पंगा, आम्ही सातपुते, स्वराज्य जननी जिजामाता, बाळू मामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत देखील त्यांनी काम केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *