‘आई कुठे काय करते’ मधील यश आहे खऱ्या आयुष्यात विवाहित, पहा त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, हिंदी मराठी चित्रपटात केलंय काम..

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या गाजत असलेली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सर्वच पात्रे हे प्रचंड गाजत आहेत. या मालिकेत अरुंधती व अनिरुद्ध यांचे पात्र देखील प्रचंड गाजत आहे. तसेच या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. मालिका आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
या मालिकेत अनिरुद्ध हा अतिशय वाहवत जाऊन विवाहबा’ह्य सं’बंध ठेवतो. आपल्याला मोठे तीन मुलं असल्याचे देखील तो विसरून जातो आणि ऑफिस मध्ये काम करणाऱ्या म’हिलेच्या प्रे’मात प’डतो. मात्र, कालांतराने मालिका वेगळ्या वळणावर येते आणि अनिरुद्ध आता त्याच्या घरीच राहायला आलेला आहे.
तो म’हिलेच्या प्रे’मात पडतो ती म’हिला आता त्याला परत बोलवत आहे. मात्र अनिरुद्ध याचा पाय घरातून आता निघत नाही. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मराठी मालिकांमध्ये अशा काही मालिका होऊन गेलेल्या आहेत त्या सर्वांना खूप आवडत होत्या.
यामध्ये काही वर्षापूर्वी आलेली ‘होणार सुन मी या घरची’ ही मालिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेत तेजश्री प्रधान हिने जान्हवी ही भूमिका केली होती. ही भूमिका सगळ्यांनाच खूप आवडली होती. तसेच शशांक केतकर याने देखील श्री ची भूमिका केली होती. ही भूमिका देखील अनेकांना आवडली होती.
काही दिवसानंतर या दोघांनी लग्न केले होते. मात्र, या दोघांचा काही कारणांनी घ’टस्फो’ट झाला होता. तसेच चार दिवस सासूचे ही मालिका देखील काही वर्षांपूर्वी आली होती. या मालिकेने देखील प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केले होते. आता आई कुठे काय करते ही मालिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
या मालिकेत यश याची भूमिका साकारणारा अभिनेता देखील सध्या खूप गाजत आहे. या आधी देखील त्याने खूप मालिकांमध्ये काम केले आहे. यश ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव अभिषेक देशमुख असे आहे. अभिषेक देशमुख याने याआधी ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेत काम केलेले आहे. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती.
या मालिकेत त्याने पुनर्वसु ही भूमिका साकारली होती. तसेच त्याने ‘स्वीट होम’ या चित्रपटातही काम केले होते. अभिषेक देशमुख याने माधुरी दीक्षित हिने निर्मित केलेल्या 15 ऑगस्ट या चित्रपटात काम केले होते. तसेच त्याने काही वेब सिरीज मध्ये देखील काम केले होते. त्याच्याकडे आगामी काळात काही चित्रपट आहेत.
त्याने 6 जानेवारी 2018 रोजी लग्न केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव कृतिका देव असे आहे. त्याची पत्नी देखील अभिनेत्री आहे. कृतिका हिने राजवाडे अँड सन्स या चित्रपटात काम केले होते. तसेच हॅपी जर्नी या चित्रपटात तिने काम केले. तसेच प्रथमेश परब सोबत तिने प्रेम दे या सीरिजमध्ये देखील काम केले होते.
हे दोघेही पती, पत्नी सो’शल मी’डियावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी ते या माध्यमातून संवाद साधत असतात. तसेच प्रेक्षकांना ते त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असतात. तर आगामी काळात त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर असल्याचे देखील सांगण्यात येते.