“आई कुठे काय करते” या बहुचर्चित मालिकेचे ‘लेखन’ करतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री…जाणून घ्या आहे कोण ती ?

“आई कुठे काय करते” या बहुचर्चित मालिकेचे ‘लेखन’ करतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री…जाणून घ्या आहे कोण ती ?

बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये कितीही हिट सिनेमे आले तरी मराठी प्रेक्षकांचे मराठी मालिकावरचे प्रे’म कमी होतांना दिसत नाही. दिवसेंदिवस मराठी मालिकांची पॉप्युलर वाढतच चालली आहे. बायकांना तर मालिका बद्दल इतकं प्रे’म असत ना की त्या रात्रीचा स्वयंपाक लवकरच करून सिरीयल बघायला येतात.

त्यांच्या आवडत्या सीरिअल मधील फेम ने जशी साडी घातली, किंवा जशी केशरचना केली तसाच पेहराव या बायका करत असतात. मालिका बघायची म्हटलं तर पुरुष मंडळी देखील मागे नाही. पुरुषांना देखील मराठी मालिका खुप आवडतात. सर्वात जास्त पॉप्युलर असणारी मालिका म्हणजे अर्थातच “आई कुठे काय करते “. ही मालिका तर संपूर्ण कुटुंब सोबत बघतात.

पण तुम्हाला माहित आहे का या मालिकेचे लेखन कोणी केले आहे म्हणून. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये “आई कुठे काय करते ” मालिकेच्या लेखिकेबद्दल बोलणार आहोत चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. मराठी मालिकांमध्ये अनेक वळणं दाखवली जातात. मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिका प्रेक्षकांची आवडती बनत जाते.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही एक कौटुंबिक मालिका आहे. घरात सर्वांनी मिळून बघावी अशी ही मालिका आहे. या मालिकेत घरात सर्वांच्या जबाबदाऱ्या कशा असतात. आणि घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या पाहिजे. हे सर्व या मालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा विषय, दर्जेदार लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वाला न्याय देणारा कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.
ही मालिका सध्या नवीन वळणावर आली आहे.

या मालिकेत व्यक्तीरेखा साकारलेल्या अरूंधतीचे ऑ’परेशन झाले असून तिला आरामासाठी देशमुख कुटुंब समृद्धी बंगल्यात घेऊन आले आहेत. तर एकीकडे संजना ही लग्नासाठी खुप उतावळी झाली आहे आणि तिने लग्नाची तारिख फिक्स केली आहे. आणि दुसरीकडे अभिषेक अनघाला पुन्हा एकदा माझ्या जीवनाची साथीदार होशील का ?, असे विचारतो.

त्यावर काहीही न बोलता, काहीही न म्हणता अनघा तिथून निघून जाते. अभिषेक अनघाच्या जीवनातील नवीन आयुष्याच्या वळणावर ही उलाढाल सध्या सुरु आहे . अरुंधतीच्या झालेल्या ऑपरेशन मुळे अनिरुद्ध अरुंधतीची विशेष सेवा करणार आहे असे ट्विस्ट आणणारी ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे.

अशा या बहुचर्चित मालिकेचे लेखन एक प्रसिद्ध अभिनेत्री करत आहे. या मालिकेची लेखिका म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा गोडबोले आहे. ती देखील या मालिकेत काम करत आहे. तिने या मालिकेतून डॉक्टर ची भूमिका साकारलेली आहे. चार दिवस सासूचे, एक निर्णय, दुसरी गोष्ट, अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

आणि प्रेक्षकांचे मन तिने जिंकले आहे. तिच्या अभिनयचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना खूपच पसंत पडत असतो. मुग्धाने हॅम्लेट या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. हे नाटक खूप लोकप्रिय ठरले होते. अभिनया बरोबरच तीच रूप देखील खूपच मोहक आहे. सध्या ती श्रीमंत घरची लेक या मालिकेत देखील काम करत आहे .

मुग्धाने एका मुलाखतीत लेखनाबद्दल खंत व्यक्त केली होती. तिने म्हटले होते की , आम्हाला संवाद लेखनासाठी पुरेसा वेळ मिळत असला तरी एकूणच टीव्ही क्षेत्रात मालिकेच्या लेखनाला आजही पुरेसे महत्त्व दिले जात नाही. ती म्हणाली होती की, स्वातंत्र्य आणि पुरेसा वेळ देऊन विश्वास ठेवला की लेखकाला उत्तम काम करता येते, याचा अनुभव मला आला आहे.

मालिकेत ओढून – ताणून नाट्य आणायचे नाही हे वाहिनीने त्यांना पहिल्या दिवसापासून सांगितलेले असते . मालिकेतल्या दोन हुशार व्यक्तिरेखांमधील संवाद रंजक करण्यासाठी लेखकाला हा पुरेसा वेळ द्यावा लागतो. लेखन करण्यासाठी लेखकाला पुरेसा वेळ मिळायलाच हवा. कारण सर्व गोष्टी या लिखाण आणि लेखकावर अवलंबून असतात.

हे काम करणे कठीण असते. लेखकाचे काम हे मालिकेच्या टी.आर.पी. शी जुळलेले असते. ती पुढे म्हणते, एखाद्या पात्रांविषयी लेखक काही विचार करत असतो. मात्र टी.आर.पी. मुळे याउलट जर भूमिका हवी असेल तर त्यानुसार ही लेखकाला आपले लिखाण बदलावे लागते .

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *