90च्या दशकात प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ ७ अभिनेत्री आज जगताय असे जीवन, पहा ‘या’ अभिनेत्रीला वा’ईट परिस्थितीमुळे करावं लागत आहे..

मनोरंजन
नव्वदच्या दशकाला बॉलिवूडचा सुवर्णकाळ म्हणून समजले जाते. अनेक कलाकारांनी या दशकांमध्ये नाव कमावले आहे. 90च्या दशकांमधील अनेक अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. अनेक गायक, संगीतकार देखील बॉलिवूडमध्ये काम करत आहेत.
मात्र याच काळातील अनेक अभिनेत्री, सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. एकेकाळी या अभिनेत्रींनी संपूर्ण देशाला वेड लावले होते. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने या अभिनेत्रींनी भला-मोठा चाहतावर्ग कमावला होता. मात्र प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेल्या या काही 90च्या दशकातील अभिनेत्री आज कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नाही.
1. पूजा भट:- बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पासूनच, पुजा भट च’र्चेत होती. अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. सडक आणि दिल हे की मानता नही, या चित्रपटांमधून तर तिने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. त्यानंतर ‘जखम’ या सिनेमांमधून, आपल्या दमदार अभिनयाने तिने अनेक दिग्दर्शकांना आपल्या अभिनयाचा परिचय दिला होता.
केवळ आपल्या सिनेमांसाठीच नाही तर, त्याव्यतिरिक्त देखील पुजा भट चांगलीच च’र्चेत राहिली होती. मात्र आज ती अभिनयापासून दूर आहे. आपली बहीण आलीयासोबत, एखादवेळेस कार्यक्रमांमध्ये ती दिसते. मात्र सध्या ती काय करत आहे, हे कोणीच नक्की सांगू शकत नाही.
2. अनु अग्रवाल:- आशिकी हा सिनेमा आजही अनेक चाहत्यांची पसंत आहे. या सिनेमाची क्रेज इतकी जास्त आहे की, त्यावरच आधारित आशिकी2 या सिनेमाला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमातील अभिनेत्री अनु अग्रवाल, आपल्या पहिल्याच सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसली होती. त्यानंतर मात्र, तिने केवळ एक-दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. आणि हळूहळू बॉलीवूड मधून गायब झाली. अनु अग्रवाल आज कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही.
3. अश्विनी भावे:- अश्विनी भावे हे मराठी चित्रपटसृष्टी मधील मोठं नाव होतं. त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हीना या चित्रपटात अश्विनी भावे यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली होती. मात्र बॉलीवूडमध्ये त्यांनी एक दोनच सिनेमे केले.
4. आयशा जुल्का:- असं सांगितलं जातं की, जो जीता वही सिकंदर या चित्रपटासाठी सर्वात पहिले दिव्या-भारती यांची निवड केली होती. मात्र त्यांच्या आकस्मित मृ’त्युने त्यांच्यासारखीच दिसणारी कोणीतरी अभिनेत्री, मेकर्सला हवी होती. त्यामुळे, आयशा जुल्काला काम करण्याची संधी मिळाली.
आपल्या पहिल्याच सिनेमांमध्ये, आयशा जुल्का यांनी आपली वेगळी छाप सोडली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत खिलाडी या सिनेमांमध्ये देखील त्यांच्या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले. नव्वदच्या दशकात आयशा जुल्का यांची क्रेझ चांगलीच वाढली होती. मात्र आज त्या कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही.
5. नीलम:- सलमान खानसोबत, एक लडका एक लडकी या चित्रपटात नीलमने काम केले होते. त्यावेळी नीलमने देखील चांगलीच चर्चा रंगवली होती. मात्र पुढे तिला हवे तसे यश मिळाले नाही, आणि बॉलीवूडमधून ती गायब झाली.
6. ममता कुलकर्णी:- करण अर्जुन, वक्त हमारा है, या सिनेमांमधून ममता कुलकर्णी हिने चांगलीच चर्चा रंगवली होती. 90च्या दशकातील सर्वात बो’ल्ड अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की, तिच्या एका चाहत्याने तिचे मंदिर देखील बांधले होते. मात्र ती व्य’सनाच्या आ’हारी गेली आणि आज सांगितले जाते की, ती सध्या मा’फियामध्ये काम करत आहे.
7. प्रिया गिल:- जोश या सिनेमातून प्रिया गिल ही अभिनेत्री चांगलीच च’र्चेत आली होती. साऊथच्या काही सिनेमांमध्ये देखील, तिने काम केले होते. मात्र बॉलीवूडमध्ये एकदम सिनेमा करून ती अचानक गायब झाली.