एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका सुंदर आहे ‘अश्विनी भावे’चा नवरा म्हणून केले लग्न, पाहा त्याचे फोटो..

एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका सुंदर आहे ‘अश्विनी भावे’चा नवरा म्हणून केले लग्न, पाहा त्याचे फोटो..

कलाक्षेत्रात मराठी कलाकारांचे स्थान अग्रगण्य आहे सुरुवातीपासूनच अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले. त्यात कलाकारांपासून ते गायिका पर्यंत जास्तीत जास्त कलाकार हे मराठी असायचे. सांगायचं झालं तर पहिला मराठी चित्रपट हा मराठी माणसानेच तयार केलेला होता.

चित्रपट सृष्टीत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके हा एका मराठी माणसाच्या नावाने दिला जातो. जसजसा काळ उलट गेला तसतसा अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपली छाप सोडली. जसं की धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चित्रपट कारकिर्दीत सतत आघाडीवर होती.

पण आज आपण अशाच एका मराठी अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत, जिने मराठी चित्रपट सृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. पण चित्रपट सृष्टी मधून ब्रेक घेतल्यानंतर पुढे या अभिनेत्री ने काय केले हे आपण जाणून घेणार आहोत.

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अ’डकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं. त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केला.

अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सो’शल मी’डियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सो’शल मी’डियावर पोस्ट करत असतात. इतकेच नाही तर सो’शल मी’डियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात.

अश्विनी भावे यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांचे पती तर दिसायला अतिशय सुंदर असून एखाद्या अभिनेत्याइतके ते सुंदर दिसतात.

त्यांच्या लग्नाला २३ वर्षं झाले आहेत. पण आजही अश्विनी आणि त्यांचे पती किशोर हे अगदी तरुण जोडप्याप्रमाणेच दिसतात. त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची जोडी खूपच छान असल्याचे तुम्ही देखील नक्कीच म्हणाल…अश्विनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचे देखील फोटो आपल्याला अश्विनी यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *