‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ ! ‘या’ चित्रपटात केले आहे एकत्र काम..

‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ ! ‘या’ चित्रपटात केले आहे एकत्र काम..

मराठी चित्रपटसृष्टी, काही दिग्ग्ज कलाकारांशिवाय अपूर्ण आहे. यामध्ये सर्वात पुढं नाव असेल सर्वांना खळखळून हसवणाऱ्या, सर्वांच्या लाडक्या लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं. आज देखील ‘लक्ष्या’ नाव घेतलं कि, सर्वात पहिले सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटते.

त्यांची कॉमेडी टायमिंग आणि अनोखी विनोदी शैली, यामुळे केवळ मराठी चित्रपटसृष्टीमध्येच नाही तर बॉलीवूड मध्ये देखील आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. आपली भन्नाट विनोदी शैली, आणि हटके असा अंदाज यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव आजही अजरामर आहे.

अशी हि बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, झपाटलेला, धूम-धडाका सारख्या अनेक मराठी सिनेमामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले होते. या सर्वच सिनेमामधील त्यांनी रेखाटलेले पात्र, भूमिका आज देखील रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान बनवून आहे.

मैने प्यार किया, हम आपके है कौन?, अनाडी आणि बेटा यासारख्या हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाची हटके छाप सोडली होती. बॉलीवूडचा हिट सिनेमा हे बेबी जेव्हा पण बघतो तेव्हा, मराठी रसिकांना मात्र आठवण येते ती ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ याच सिनेमाची.

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने या सिनेमाला, मनोरंजनाच्या मोठ्या पायरीवर नेऊन ठेवले होते. मराठी सिनेसृष्टीमधील या जोडीने आपल्या भन्नाट विनोदी शैलीने कित्येक दशक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या जोडीचा कोणताही सिनेमा सुरु झाला कि, प्रेक्षक आपले दुःख विसरून काही क्षण खळखळून हसत.

आपल्या लाडक्या ‘लक्ष्या’ला मराठी रसिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावरच उचूलन ठेवले होते असे बोलणे वावगे ठरणार नाही. मात्र,हि प्रसिद्धी लक्ष्मीकांत बेर्डे याना एका रात्रीतून मिळालेली नाही. त्यासाठी कित्येक दिवस त्यांचा चांगलाच संघर्ष करावा लागला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले होते.

त्यांचे भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे त्यावेळी अनेक नाटकांचे, दिग्दर्शक होते. त्यांच्याच सोबत अनेक नाटकांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले. मात्र त्या दोघानी सोबत काम केलेलं एक नाटक आज देखील रसिकांच्या मनात आहे.

ते म्हणजे टूरटूर. हे नाटक कमी वेळात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना देखील एक नवी ओळख याच नाटकामधून मिळाली होती. पुरुषोत्तम बेर्डे यांनी देखील, दिग्दर्शक म्हणून अनेक सिनेमा बनवले आहेत, मात्र प्रकाशझोतात येणे त्यांना तितकेसे आवडत नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.