हृतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री, चक्क वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी बनली ‘आजी’, नातीसोबत फोटो केले सोशल मीडियावर शेअर!

बॉलिवूडमध्ये कोणालाही एकदा लोकप्रियता मिळाली तर ते अक्षरशः यशाच्या शिखरावर जाऊन बसतात. संपूर्ण जगात भारतीय चाहत्यांचे जे प्रेम असते ते खूपच वेगळे असते असे अनेक वेळा जगातील खूप मोठाले स्टार सांगतात. त्यामुळे बॉलीवूड कडे अनेक स्टार नेहमीच आकर्षित होतात.
जगभरातून, बॉलीवूड मध्ये आपले नशीब अजमावण्यासाठी स्टार्स येतात. त्यामध्ये, अभिनेत्रींच्या संख्या जास्त आहेत. या बॉलीवूडमध्ये, अनेक परदेशी अभिनेत्री आणि मॉडेल्स आपले नशीब आजमावण्यासाठी येतात. कॅटरीना कैफ हिने भारतामध्ये येऊन, येथील लोकांना आपल्या सौंदर्याने आणि डान्सने वेडेच केले आहे.
त्याचबरोबर, जॅकलिन, नरगिस फकिरी अश्या काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे आपल्या देशात खूप चाहते आहेत. आणि त्यांना भारतामध्ये यश देखील मिळाले आहे. असेच आपले नशीब अजमानवण्यासाठी, एक मेक्सिकन सुंदरी आली होती. खास म्हणजे, ह्या मेक्सिकन सुंदरीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच लाखो चाहते होते. आणि ज्याच्या सोबत ती सिनेमा करणार होती, तो हृतिक रोशन देखील तिचा फॅन होता. काईट्स सिनेमातून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री, बार्बरा मोरी.
काईट्स ह्या सिनेमामधून बार्बरा मोरी हिने बॉलीवूड मध्ये आपले नशीब आजमावले. ह्या सिनेमामधील गाणे आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहेत. ‘दिल क्यूँ ये मेरा शोर करे’ हे गाणे खास करुन आजही, सर्वात जास्त रोमँटिक गाण्यांपैकी एक समजले जाते. ह्या सिनेमामध्ये बार्बरा मोरी आणि हृतिक ह्या दोघांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होती.
असे सांगितले जाते कि, हृतिक ह्याला बार्बरा मोरी हि सुरुवातीपासूनच खूप आवडत होती. जेव्हा हृतिक तिला भेटला तिच्या सौंदर्यामुळे तो सर्वच काही विसरला. तिच्या आणि हृतिक या दोघांच्या अ’फेअर च्या चर्चेला तेव्हा चांगलेच उधाण आले होते.
ह्याचे कारण होते, बार्बरा मोरी च्या हातावर जसे टॅटू आहे अगदी तसेच टॅटू हृतिक ह्याने देखील बनवले होते. मात्र नंतर समोर आले की त्याचप्रकारचे टॅटू हृतिक ची बायको सुजन हिने देखील बनवले आहे म्हणून त्यांच्या अ’फेअर ची चर्चा थांबली.
कायट्स सिनेमाचे संगीत जरी उत्तम ठरले असले तरीही, तो सिनेमा बॉलीवूड मध्ये चांगले काम करू शकला नाही. बार्बरा मोरीचे सौंदर्य देखील या सिनेमाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही, अश्या त्यावेळी बातम्या येत होत्या. बॉलीवूड मध्ये जरी बार्बरा मोरीचे नशीब चांगले ठरले नसले तरीही, आजही मेक्सिकन सिनेमांमध्ये तिचे मोठे नाव आहे.
आजही बार्बरा मोरीचे सौंदर्य बघून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की तिची एक सहा वर्षांची नात आहे. २ फेब्रुवारी १९७८ मध्ये उरुग्वे येथे बार्बरा मोरीचा जन्म झाला होता. सर्जिओ मेयरसोबत बार्बरा १९९६ मध्ये रिलेशनशिपमध्ये होती आणि या नात्यातून तिला एक मुलगा असून त्याचे नाव सर्जिओ मेयर मोरी आहे.
२०१६ मध्ये बार्बराने बास्केटबॉल खेळाडू केनेथ रे सिगमनशी लग्न केले होते. पण लग्नाच्या एकाच वर्षानंतर २०१७ मध्ये त्यांचा घ’टस्फो’ट झाला. तिचा मुलगा आता मोठा झाला असून त्याला एक ६ वर्षांची मुलगी देखील आहे. त्याच्या मुलीचे नाव मिला असे आहे. आता बार्बरा केवळ ४३ वर्षांची आहे, म्हणजे जेव्हा ती आजी बनली तेव्हा तिचे वय अवघे ३८ वर्ष होते.
माय ब्रदर्स वाईफइ,नसिग्निफिकेंट थिंग्स,Violanchelo,कान्टफ्लास या काही बहुचर्चित सिनेमांमध्ये बार्बराने काम केले आहे. ती सोशल मीडियावरील अगदी ऍक्टिव्ह सेलिब्रिटीज पैकी एक असून आपले अनेक बोल्ड फोटोज ती शेअर करता असते.
काही दिवसांपूर्वी तिने आपल्या नातीसोबत देखील फोटो शेअर केला होता. आपल्या मुलाचा आणि नातीचा फोटो ती नेहमीच शेअर करत असते. मात्र, केवळ ४३ वर्षांच्या या बो’ल्ड अभिनेत्रीची सहा वर्षांची एखादी नात आहे यावर अजूनही बऱ्याच लोकांचा विश्वासच बसत नाही.