हुबेहूब वडिलांची कॉपी दिसतो शक्ती कपूरचा मुलगा, फोटो बघून चाहतेही झाले थक्क..

मनोरंजन
मुलं आपल्या पालकांना सारखे दिसतात यात, काही नवीन नाही. बऱ्याच वेळा अनेक मुलं हुबेहूब आपल्या पालकांचा सारखीच दिसत असतात. आणि त्यांचे फोटोज बघून नक्की हा फोटो मुलाचा हि वडिलांचा हे ओळखणे देखील अशक्य होऊन जाते.
र्वसामान्य आयुष्यात देखील आपण अशी अनेक उदाहरणे पाहिले आहेत की, मुलं हुबेहूब आपल्या वडिलांसारखे किंवा आईसारखे दिसतात. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीजचे देखील आयुष्य असते, हे आपण खूप वेळा पाहिले आहे. सेलिब्रिटीज सुद्धा आपल्या मुलांना आपल्या सारखे दिसत आहे हे ऐकून आनंद होतो.
अनेक सेलिब्रिटीजची मुले हुबेहूब आपल्या पालकांसारखीच दिसतात. जानवी कपूर मध्ये श्रीदेवीचा निरागसपणा अगदी सहजपणे झळकतो. सारा अली खान हुबेहूब आपल्या आई सारखीच दिसते. रणबीर कपूर अनेक वेळा पूर्णपणे आपली आई नीतू सिंग सारखा दिसतो, असे अनेक सेलिब्रिटीज आहेत जे आपल्या पालकांना सारखी दिसतात.
शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा मात्र आपल्या वडिलांसारखी दिसत नाही. शक्ती कपूर यांनी गेली कित्येक दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम केले आहे. कॉमेडी, खलनायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिका शक्ती कपूर यांनी साकारल्या आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर हीदेखील मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. श्रद्धा कपूरने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये देखील काम केले आहे.
आपल्या छोट्याशा कारकीर्दीत मध्ये देखील श्रद्धाने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पात्रांमध्ये एकरूप होण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे हे तिने सिद्ध केले आहे. श्रद्धाचा आज भला मोठा चाहतावर्ग आहे. मात्र श्रद्धाच्या भावाची अर्थात सिद्धांत कपूरची खूप कमी चर्चा सुरू होती. अजून बऱ्याच लोकांना तिला एक भाऊ आहे हे देखील माहीत नाही.
शक्ती कपूर सोशल मीडियावर सक्रिय नसतात मात्र, बऱ्याच रियालिटी शोमध्ये सहभागी होतात. त्यावेळी ते आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मागील काही दिवसांपासून ते ज्या रियालिटी शो मध्ये जातील, तिथे आपल्या मुलाला अर्थात सिद्धांत कपूरला नक्कीच प्रमोट करताना दिसून येत आहे. बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी आपल्या मुलांना लॉन्च करण्याचा प्रयत्न करतच असतात.
काही दिवसांपूर्वीच जावेद जाफरीचा मुलगा प्रियदर्शन यांच्या हंगामा सिनेमांमध्ये झळकला होता. त्याच सोबत परेश रावल यांचा मुलगा बम्ब फाड या चित्रपटात झळकला होता, त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला बघितले गेले. सिद्धांत कपूर ने अजून पर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये; परंतु त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले आहेत. काही रियालिटी शो मध्ये त्याने आपली उपस्थिती लावली होती.
स्टार कीड असूनही त्याने आपल्या करीयरची सुरुवात एक असिस्टंट दिग्दर्शक म्हणून केली आहे. चूप चूप के, भूल-भुलैया यासारख्या सिनेमांसाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले आहे. शूटआऊट ऍट वडाला मधून सिद्धार्थ ने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर अनुराग कश्यपच्या सायकॉलॉजी थ्रिलर अगली मध्ये देखील तो झळकला होता. मात्र, बॉलिवूडमधील त्याची पुढील वाटचाल कशी असेल हे बघणे रोमांचक ठरेल.