‘ही’ व्यक्ती आहे नाना पाटेकर यांच्या सगळ्यात जवळची, कायम सावलीप्रमाणे ती व्यक्ती असते सोबत…

बॉलिवूडमध्ये अनेक असे दिग्गज अभिनेते आहेत. मात्र, मराठीतून बॉलिवूडमध्ये करिअर करणारे असे अभिनेते फार कमी आहे. त्यामध्ये नाना पाटेकर यांचा उल्लेख आवर्जून घ्यावा लागेल. नाना पाटेकर हे बॉलिवूडमध्ये स्थिरावलेले एक मोठे नाव आहे. याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील अनेक हिंदी चित्रपटातून काम केले.
मात्र, मुख्य भूमिकेत त्यांना काम कधी मिळाले नाही. याचप्रमाणे अशोक सराफ यांचे नावदेखील घ्यावे लागेल. अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केलेले आहे. मात्र, त्यांना देखील साईड रोड मिळालेला आहे. काही वर्षांपूर्वी आलेला सिंघम चित्रपट आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटात देखील त्याने हवालदाराची भूमिका साकारली होती.
मात्र, आपल्या भूमिकेला ते न्याय देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतात. तसेच मूळ मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मात्र बॉलिवूडमध्ये अफलातून असे यश मिळवलेले आहे. बॉलिवूडमध्ये ती एकमेव अशी हीरोइन आहे की तिने आजवर अफाट असे यश मिळवलेले आहे. श्रीदेवीनंतर माधुरी दीक्षित हिचा नंबर लागतो.
माधुरी सारखे यश आजवर कोणालाही मिळाले नाही. माधुरीही नवीन पिढीसाठी देखील आयकॉन अशीच आहे. याच प्रमाणे सोनाली बेंद्रे हिचे नावदेखील घ्यावे लागेल. सोनाली बेंद्रे हिनेदेखील बॉलीवूड मध्ये चांगले यश मिळवले आहे. मात्र, दिग्दर्शक गोल्डी बहल सोबत लग्न केल्यानंतर तिने आता चित्रपट करणे सोडून दिले आहे.
काही वर्षापूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर ती बहुतांश वेळा घरीच असते. मात्र, अधून मधून की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी मराठी नाटकमध्ये देखील काम केले होते. त्यांचे पुरुष हे नाटक प्रचंड गाजले होते.
त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली. माफीचा सा’क्षीदार हा देखील त्यांचा मराठी चित्रपट आला होता. त्यानंतर अनेक चित्रपटातून हिंदीमध्ये त्यांनी काम केलेले होते. जवळपास सर्वच चित्रपट हिट झालेले आहेत. यामध्ये क्रांतिवीर, अग्निसाक्षी, वेलकम, परिंदा, तिरंगा यासारखे अनेक त्यांचे चित्रपट हिट झाले आहेत.
त्याचप्रमाणे माधुरी दीक्षितसोबत त्यांचा आलेला वजूद हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. मात्र, समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते. तसेच खामोशी हा चित्रपट त्यांचा विशेष गाजला होता. या चित्रपटात त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीची भूमिका केली होती.
हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात मनिषा कोईरालाची भूमिका होती. या चित्रपटानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पत्नी सोबत भां’डण झाल्याचे सांगण्यात येते. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर आहे.
नाना पाटेकर यांच्या पत्नी बँकेत नोकरी करत होत्या. त्यावेळेस त्यांना अडीच हजार रु’पये महिना होता. नाना पाटेकर यांच्या पेक्षा देखील त्यात जास्त पै’से त्या कमवत होत्या. मात्र, नाना पाटेकर यांना चित्रपटात काम करायचे असल्याचे त्यांनी हेरले होते. यासाठी निलकांती यांनी नाना यांना खूप पाठिंबा दिला होता. त्यामुळेच नाना पाटेकर पुढे जाऊन यशस्वी झाले.
नीलकांती पाटेकर यांनी आत्मविश्वास या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता नीलकांती आणि नाना पाटेकर हे वेगवेगळे राहतात. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतला नाही, असे असले तरी ते वेगळे राहतात. नाना पाटेकर आणि निलकांती यांना मल्हार हा मुलगा आहे. नाना पाटेकर एका मुलाखतीत म्हणाले होते की, मला सर्वाधिक जवळचा आहे तो माझा मुलगा.
अनेक सुखदुःख मी त्याच्या सोबत शेअर करत असतो. तो सावलीप्रमाणे माझ्या सोबत असतो आणि माझी काळजी घेतो, असे ते म्हणाले होते. तसेच मल्हार हा देखील माझे वडील माझ्यासाठी देवा प्रमाणेच आहेत, असे मल्हार म्हणतो. नाना पाटेकर यांच्याकडे सध्या अनेक चित्रपटाचे काम असल्याचे सांगण्यात येते.