‘ही’ मराठी मुलगी आहे देशातील पहिली सुपर मॉडेल, हिला पाहातच मलायका आरोराचा चढतो पारा…

फॅशन सिनेमा तर तुम्हाला आठवत असेलच. एक मध्यमवर्गीय मुलगी, मॉडेल नाही तर सुपरमॉडेल बनायचे स्वप्न घेऊन मुंबईमध्ये येते आणि प्रचंड संघर्ष करत आपली जागा मिळवते व आपले स्वप्न पूर्ण करते. अनेक मुलींना ही कथा आपली वाटली असेल. अनेक मुलींनी या सिनेमामधून प्रेरणा देखील घेतली असेल मात्र ही कथा आहे एका मराठी सुपरमॉडेलची.
मराठमोळी मध्यमवर्गीय मुलगी अनेक स्वप्न आपल्या उराशी बाळगते. देशातील बऱ्याच मुलींना, टीव्ही वर किंवा कोणत्या मोठ्या ब्रॅण्डच्या पोस्टरवर एखाद्या मॉडेलला बघितले कि तिच्यासारख मोठं होण्याची इच्छा निर्माण होते. मात्र हे सर्व बघायला कितीही सोपं असलं तरीही ते तेवढच अवघड देखील आहे. मात्र हे खरे करून दाखवलं एका मराठमोळ्या मुलीने.
ती केवळ मॉडेल नाही तर देशातील पहिली सुपरमॉडेल बनली. उज्वला राऊत ही भारतातील पहिली सुपरमॉडेल आहे. उज्वला राऊत हि मुंबईच्या एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मली. तिचे वडील पो’लीस खात्यामध्ये अधिकारी होते. तिचे बालपण सर्वसाधारण मुलींसारखेच होते मात्र मॉडेल बनायची इच्छा तिला सुरुवातीपासूनच होती.
एका साधारण कुटुंबामध्ये सुसंकृत असे वातवरण असते आणि आजही अशा कुटुंबामध्ये मॉडेलिंग हे तेवढे प्रतिष्ठित क्षेत्र समजले जात नाही. मात्र उज्वला ने आपल्या स्वप्नांच्या बाबतीत तडजोड करणे स्वीकारले नाही आणि कॉलेजमध्ये गेल्यावर तिने सौंदर्यस्पर्धेमध्ये भाग घेतला. केवळ १७ व्या वर्षी तिने मिस फेमिना या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ती स्पर्धा जिंकली.
या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिने आपल्या मॉडेलिंग करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने फ्रान्समधील एलिट मॉडेल लूक या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने एकापाठोपाठ एक असे अनेक मॉडेलिंग असाईनमेंट केले आणि यशाची शिखर गाठली.
सुपरमॉडेल मिलिंद सोमण याच्यासोबत तिने किंगफिशर ची पहिली ऍड केली आणि तिने त्यामध्ये चांगलीच प्रसिद्धी कमावली. मात्र मॉडेलिंग इंडस्ट्री मध्ये आज उज्वला राऊत हे खुप मोठे नाव असण्याचे केवळ हेच कारण नाहीये. तिने खूप सारे इंटरनॅशनल मॉडेलिंग असाईनमेंट देखील केले आहेत. न्यूयॉर्क आणि फ्रन्समध्ये झालेल्या अनेक फॅशन वीकमध्ये तिने कॅटवॉक केला आहे.
आपल्या दमदार आणि मादक अश्या मॉडेलिंग वॉक ने तिने परदेशात देखील अनेक चाहते कमवले आहेत त्यामुळेच ती भारताची खऱ्या अर्थाने पहिली ‘सुपरमॉडेल’ बनली. तिची बहीण सोनाली राऊत हि देखील खूप मोठी मॉडेल आहे. मात्र, बी-टाऊन मध्ये तिच्या आणि मलायका अरोराच्या कॅटफायटचे अनेक किस्से ऐकायला मिळतात.
जेव्हा अरबाज खान आणि मलायका दोघे विवाह बंधनात अडकलेले होते तेव्हा, एका डिझायनर ने मलायकच्या जागी अरबाज खान सोबत उज्वला राऊतला शोज टॉपर बनवले होते. आणि तेव्हापासून त्या दोघींमध्ये वा’द सुरु झाला असे सांगण्यात येते. त्यानंतर ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर’ या एमटीव्हीच्या शोमध्ये, दोघी सोबत सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये उज्वला मेन्टॉर होती आणि मलायका जज होती. मात्र उज्वलाचे चाहते या शो मध्ये मलायका पेक्षा जास्त होते. असे सांगितले जाते कि अनेक वेळा, उज्वला या शोच्या दरम्यान, क्रू मेम्बर आणि बाकीच्या स्टाफ ला आपले आणि अरबाज खानचे किस्से चांगलेच रंगवून सांगत असे.
त्यामुळे मलायका चांगलीच चिडत होती. त्यातच, त्या दोघांच्या सोबत असण्याच्या बातम्या मीडियामध्ये सुरु होत्या आणि त्यातच उज्वला अनेक वेळा मलायका ला अजूनच चिडवण्यासाठी अरबाज सोबत फ्लर्टींग करत असे. त्यामुळे मालयकाचा पारा चांगलाच चढला होता.