‘ही’ मराठमोळी अभिनेत्री विकत आहे तिचे जुने कपडे ? कारण वाचून चकित व्हाल..

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री विकत आहे तिचे जुने कपडे ? कारण वाचून चकित व्हाल..

सध्याच्या या जगात, कधी कोणाच्या डोक्यात कशाचं खूळ येईल हे आपण सांगूच शकत नाही. प्रत्येकाच्या डो’क्यात वेगवेगळे खूळ आल्याच आपण पाहिलं आहे. बर या खुळाचा काहीच नेम नाही, कधी कोणाला स्वयंपाक करायच खूळ येते तर कधी कोणाला फोटोग्राफीच खूळ सुरू होत.

कधी कोणाला गायनाचा छंद सुरू होतो तर कधी कोणाला पन्नाशीत डान्स करण्याची हाऊस येते. यासर्वात बऱ्याच वेळा आपले मनोरंजन देखील होते. अनेक सेलेब्रिटीज \ला सुध्दा वेगवेगळे वेड लागेलेलं असते. त्यापैकी बऱ्याच अभिनेत्रीना खास डिझायनर कपड्यांची भारी हाऊस असते. अनेक अभिनेत्री आपली ही हाऊस पूर्ण पण करतात.

मात्र अभिनेत्री आहे, मग एकदा घातलेला ड्रेस त्या सतत घालू शकता नाही. मग नक्की त्या या ड्रेसच काय करतात. नेहमी आपल्याला प्रश्न पडतो, या अभिनेत्री व बाकी फिल्स्टार आपल्या या भारी महागड्या डिझायनर कपड्यांचं नक्की करतात तरी काय? आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने त्याला उत्तर दिले आहे. बऱ्याच अभिनेत्री आपले हे कपडे डोनेट करतात.

आता हे काही वेळा ऐकले तर होते, मात्र डोनेट म्हणजे नक्की काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर या अभिनेत्री आपले हे कपडे विकतात, आणि त्या कापड्यांडमधून मिळणारे पैसे गरजूंना देतात. असाच उपक्रम आता सई लोकूर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुद्धा सुरू केला आहे. सई लोकूरने कपिल शर्मा सोबत ‘किस किस को प्यार करू’ या सिनेमातून बोलीवूड मध्ये पदार्पण केले.

मात्र तिला खरी ओळख मिळाली ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वमधूनच. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सई लोकूरला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. काहींनी तिच्यावर टीका केली तर काहींना तिचा निरागस पणा मनात बसला. मात्र त्यानंतर ती कायमच चर्चेत आहे. नुकतंच माघील वर्षी सई लोकूरने लग्न केले.

त्यावेळी तिच्या सर्वच लुक्सचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. तिने त्यावेळी अनेक महागडे आणि डिझायनर कपडे व साड्या घातल्या होत्या. मनीष मल्होत्राच्या पांढऱ्या ड्रेसने तर चांगल्याच चर्चा रंगवल्या होत्या. आता हेच सर्व कपडे तिने विकायला काढले आहेत. आपले उंची कपडे विकण्यासाठी तिने एक वेबसाईट देखील सुरू केली आहे. तिच्या या उपक्रमाचे सगळीकडून तोंडभरून कौतुक होत आहे.

ड्रेस विकून येणारे पैसे ती एका अनाथाश्रम मध्ये दान करणार आहे. त्यामुळे तिचे खास कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, हा सर्व व्यवहार अगदी परदशर्क असणार आहे. सई लोकूर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. लग्न झाल्यानंतर ती प्रत्येक सणाचे फोटो ती शेअर करत असते आणि त्याला भरभरून लाईक्स सुद्धा मिळतात.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *