हिच्या प्रे’ग्नन्सीच काय एवढं कौतुक, आमचे पोर ढगातून पडतात का? प्रे’ग्नन्सी फोटो शेअर केल्याने ‘ही’ मराठी अभिनेत्री झाली ट्रोल…

आई बनणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खुपच सुखद अनुभव असतो. एका महिलेला जेव्हा समजते की, ती आई होणार आहे, तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नाही. एक जीव आता आपल्या श’रीरात, स्वतःच्या ग’र्भात वाढणार आहे या अनुभवाने तिला एका नवा आनंद,नवे सुख मिळते. जेव्हा एक महिला आई होते तेव्हा ती परिपूर्ण होते असं म्हणल जातं.
त्यामुळे सेलेब्रिटी असेल किंवा खेळाडू, पोलीस असेल किंवा सर्वसामान्य स्त्री, आई होण्याची भावना प्रत्येक महिलेसाठी गौरव आणि अभिमानाची बाब असते. आपला हा अनुभव सर्वांसोबत शेअर करावा, आपल्या भावना व्यक्त कराव्या असं प्रत्येक स्त्रीला वाटत असत. त्यासाठी सध्या अनेक महिला सोशल मीडियाचा आधार घेतात.
आपण आई होणार असल्याचं अगदी आनंदाने सगळ्यांना सांगतात. त्यामध्ये आपल्या सेलिब्रिटीज देखील काही कमी नाही. आपण आई होणार असलायची बातमी येताच, आपल्याकडे बॉलीवूड असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टी त्या सेलिब्रिटीज मोठ्या आनंदाने आपल्या चाहत्यांसोबत हि बातमी शेअर करतात.
अनेकवेळा आपण पाहिलं आहे की, चाहते देखील त्यांच्या या बातमीला शुभेच्छा देत काळजी घेण्यास सांगतात, मात्र काही टवाळक्या करणारे नेटकरी त्यातही सेलिब्रिटीजला ट्रोल करताना माघे पुढे बघत नाही. आता अश्याच ट्रोल्सचा सामना मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला करावा लागत आहे. उर्मिला ला आपण ग’र्भव’ती असल्याची बातमी समजताच, आपल्या चाहत्यांना देखील तिने हि बातमी देत आपण अत्यंत खुश असल्याचं म्हणलं होत.
त्यानंतर आपल्या प्रे’ग्नंसीचा काळ ती अगदी आनंदात अनुभवत आहे. कोणतीही स्त्री ग’र्भव’ती असल्यावर आपल्याकडे तिची आणि तिच्या भावनांची जरा जास्तच काळजी घेतली जाते. मात्र काहींना यात पण खुचपत काढायचीच असते. उर्मिला सतत आपले फोटोज सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र तिच्या या फोटोजला आता ट्रोल करण्यात येत आहे.
‘एवढं काय कौतुक हिच्या प्रे’ग्नन्सीचं ?कोणाला काय पोट येत नाही का? आमची मुलं काय आभाळातून पडतात का ?’ असे अनेक कमेंट्स तिच्या फोटोंवर केले गेले आहेत. आता मात्र, उर्मिलाची सहनशीलता सम्पल्यामुळं तीने या ट्रोलर्सला चांगलच उत्तर दिल आहे.
तिनं आपल्या सोशल मीडियावर उत्तर देत लिहलं आहे की,’आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’‘एवढं काय हिचं प्रे’गन्सीचं कौतुक’?‘कोणाला काय पोटं येत नाहीत का?’ मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात. स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे.
पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या, या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा ९वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत.
आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे’ तिच्या या उत्तराचे अनेक लोक कौतुक देखील करत आहेत. वाईट अनुभव सगळ्यांना येतात, मात्र तरीही तू जे ऐकून घेऊन सुद्धा आपल्या आनंदात विघ्न पडू दिला नाही याचे कौतुक आहे, असं काही लोक कमेंट करत आहेत.
उर्मिलाचे ९ महिने पूर्ण होत आलेले असून आता लवकरच तिचे बाळ जन्माला येणार आहे. त्यामुळे सर्वानी तिला शुभेच्छा देत काळजी घेण्यास देखील सांगितले आहे. उर्मिलाची दुहेरी ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती, त्याचबरोबर तिने दिया और बाती हम आणि मेरी आशिकी तुमसेही सारख्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.