“हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” हिंदू सणाबद्दल ट्विट केल्याने ट्रो’ल झाला रितेश देशमुख…

“हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….”  हिंदू सणाबद्दल ट्विट केल्याने ट्रो’ल झाला रितेश देशमुख…

मनोरंजन

सोशल मीडियावर सर्वात जाहस्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक रितेश देशमुख आहे. रितेश देशमुख कायमच चर्चेत असतो. आपल्या करियरच्या सुरुवातीपासूनच, रितेश चर्चा रंगवत असतो. एका मुख्यमंत्र्यांचा मुलगा, जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो तेव्हा, केवळ आपल्या वडिलांच्या नावाच्या जीवावर तो आला आहे, असा सर्वांचा समज होतो.

तोच समज, रितेशच्या बाबतीत देखील झाला होता. मात्र आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये त्याने दमदार अभिनय केला आणि हा समज पुसून काढला. रितेशने अनेक वेगवेगळ्या सिनेमामध्ये काम केले आहे. एक उत्तम विनोदी कलाकार म्हणून देखील त्याने आपली अशी ओळख बनवली आहे. आपल्या करियरमध्ये त्याने जवळपास सर्वच प्रकारचे पात्र, भूमिका रेखाटल्या आहेत.

हाऊसफूल, धमाल, मालामाल विकली सारख्या सिनेमामध्ये, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा रितेश, एक विलीन सिनेमामध्ये सर्वांचा थरकाप उडवतो. हेच त्याच्या बहुरंगी अभिनयाचे उदाहरण आहे. रितेश देशमुखने आपली जुनी खास मैत्रीण आणि पहिल्या सिनेमातील अभिनेत्री जिनेलिया सोबत लग्न केले आहे. जिनेलिया आणि त्याची प्रेमकहाणी देखील पूर्ण फिल्मी आहे.

जिनेलियाने बॉलीवूडमध्ये तुझे मेरी कसम सिनेमातून पदार्पण केले असले तरीही, साऊथमध्येच जास्त सिनेमा केले. जिनेलिया साऊथमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लग्नानंतर बऱ्याच काळापासून ती मोठ्या पडद्यावर झळकली नाहीये, मात्र सोशल मीडियावर आणि छोट्या पडद्यावर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. छोट्या पडद्यावर ती काही रियालिटी शोचे सूत्रसंचालन देखील करत आहे.

जिनेलिया, रितेश सोबत अनेक वेगवेगेळे व्हिडियोज सोशल मीडियावर शेअर करत असते. आणि त्या दोघांच्या व्हिडियोजला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येतात. अनेकवेळा त्यांचे व्हिडियोज वायरल देखील होतात. सध्या मात्र, रितेशने शेअर केलेली एक पोस्ट सगळीकडेचं तुफान वायरल होत आहे. रितेश बऱ्यापैकी आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो. जिनेलिया आणि रितेश दोघेही अगदी फिट आहेत.

त्याच संदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली होती. दसरा झाला असून आता दिवाळी येत आहे. याकाळात सर्वचजण एकेमकांना मिठाई गिफ्ट करतात, आणि मिठाई खाण्याचा आनंद देखील घेतात. दिवाळीचा सण आपल्या संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सुंदर कपडे,फटाके, दिवे आणि खूप सारे वेगवेगळे जिन्नस, यासाठी देखील दिवाळी सण ओळखला जातो.

सध्या वाढत्या महागाई सोबतच, मिठाईच्या किमती देखील चांगल्याच वाढल्या आहे. रितेशने देखील याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रितेशने मिठाईच्या किंमती देखील टाकल्या आहेत. यात सगळ्यात मजेशीर म्हणजे सणांमध्ये मिठाईचे वाढते दर, तर दुसरीकडे वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी लागणारा खर्च लिहिला आहे.

यात लाडू, जलेबी, काजू बर्फी आणि चॉकलेटचे भाव सांगितले आहेत. या लिस्टच्या शेवटी वजन कमी करण्यासाठी लागणारे पैसे देखील त्याने टाकले आहेत. हे शेअर करत “डोक लावून निवडा, मला वाटलं तुम्हाला चेतावनी देऊ”, असे कॅप्शनसुद्धा रितेशने दिले आहे. त्यावर एका मा’थेफि’रू नेटकऱ्याने अर्थाचा अनर्थ करत, रितेशवर टी’कास्त्र सोडले आहे.

त्या नेटकाऱ्याने लिहले आहे की, ‘तुम्ही फक्त सनातनी सण असतात तेव्हा ज्ञान देता का? ईद किंवा ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही तोंडात दही गोळा करतात.’ रितेशने देखील त्याला चांगेलच उत्तर दिले आहे. त्या नेटकाऱ्याला उत्तर देत रितेशने पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘सॉरी सर, मी विगन आहे, मी दही खात नाही.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *