स्नेहा वाघमुळे Bigg Boss Marathi 3 वा’दात ! ‘तो’ व्हिडिओ पाहून भ’डकले चाहते, म्हणाले हीला…

मनोरंजन
एकदा तुम्ही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला की, त्यानंतर तुम्हाला घरच्या बाहेर असणाऱ्या कोणाशीही, कसलाही संपर्क ठेवताच येत नाही. आपले कुटुंब, मित्र किंवा आपली पीआर टीम यापैकी कोणाशीही, बिग बॉसच्या सदस्यांना संपर्क करता येत नाही.
जिथे कोणासोबत संपर्कच करता येत नाही, तिथे सो’शल मी’डियावर हे सदस्य सक्रिय कसे राहू शकतात, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. बिग बॉस या शोचा फॉरमॅटच तसा आहे की, घरात येणारे सदस्य एकदा घरात बंद झाले तर त्यांना एलिमिनेट होऊ पर्यंत किंवा शो संपेपर्यंत बाहेर येण्यास मज्जाव असतो. सोबतच, कोणत्याही प्रकारचे संपर्काचे साधन ते वापरू शकत नाही.
फोन, इंटरनेट सर्व काही वापरण्यास बं’दी असते. त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा मित्रपरिवाराच्या बाबतीत, काही अघ’टीत घ’टना घडली तरच त्यांना त्याबद्दल माहिती दिली जाते, किंवा घराच्या बाहेर काढले जाते. पण सध्या, सोशल मीडियावर मराठी बिग बॉसच्या बाबतीत वेगळीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे.
अभिनेत्री स्नेहा वाघने देखील बिग बॉसमध्ये यंदा आपली हजेरी लावली आहे. मराठी मालिका ‘काटा रुते कुणाला’ मधून तिने सिनेसृष्टीमधे प्रवेश केला. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमामध्ये तिने काम केले. तिथूनच तिला हिंदी मालिकांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान तिने, अनेक मराठी सिनेमामध्ये काम करून आपली वेगळी निर्मण केलेल्या अविष्कार सोबत लग्न केले होते.
मात्र घ’रेलू, हिं’साचाराची त’क्रार करत स्नेहाने त्याच्यापासून घ’टस्फो’ट घेतला. आता हेच दोघे पुन्हा बिग बॉसच्या घरात आमने-सामने येऊन उभे ठाकले आहेत. स्नेहा वाघ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र, बिग बॉसच्या घरात जाऊन देखील तिचे फोटोज आणि व्हिडियोज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहेत.
हे नक्की काय आणि कस आहे याबद्दलच सर्वाना गूढ वाटत आहे. खास करून स्नेहाचा एक व्हिडियो सगळीकडेच वाय’रल होत आहे. या व्हिडियोमध्ये स्नेहाने डेनिमचा जम्पसूट घातला आहे. गुलाबी रंगाचे कानातले आणि दोन्ही बाजूने पिना लावून केसांची हेअर स्टाईल केली आहे. या लूकमध्ये ती कमालीची क्युट दिसत आहे.
मात्र, तिचा अगदी असाच लूक बिग बॉसच्या घरात देखील काहीच दिवसांपूर्वी बघायला मिळाला. या व्हिडियोमध्ये ती आपल्या चाहत्यांना गॉसिप किचनचे काम असा प्रश्न विचारात आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना, तू असा प्रश्न विचारत आहेस? असं कस शक्य आहे? मग हा बिग बॉस शोचं स्क्रिप्टेड आहे, हे समजत आहे, असे वेगवेगळे कमेंट्स स्नेहा वाघाच्या या व्हिडियोवर येत आहेत.
सोबतच, ती सध्या घरात घालत असणारे कपडे, व त्याचे देखील अनेक फोटोज तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून शेअर केले जात आहेत. त्यामुळे हे नक्की कसे, असा प्रश्न सर्व नेटकरी विचारत आहेत. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी, अनेक सेलिब्रिटीज आपल्यासाठी स्पॉन्सर्स शोधतात. हे स्पॉन्सर्स, बिग बॉसच्या घरात त्या सदस्यांच्या पूर्ण लूकची काळजी घेतात.
त्याचाच भाग म्हणून, स्नेहा वाघाने ज्या स्पॉन्सर्सचे कपडे घातले आहेत, त्यांनी बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच फोटोशूट केलं आहे. शिवाय या सदस्यांचे सोशल मीडिया अकाउंट, त्याचे पीआर वापरत असतात, त्यामुळे आपल्याला ते सेलिब्रिटीज सक्रिय असल्याचं बघायला मिळत. पीआर, घरात त्या सदस्यांचा समर्थन करत त्यांच्या कार्यासंदर्भात फोटोज, सोशल मीडियावर टाकतच असतात.