‘या’ मराठी अभिनेत्रीने सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून केलंय एअर होस्टेसचं काम, अनेक हिंदी सिनेमात केलंय काम..

मनोरंजन
आज अनेक मराठी कलाकारांनी, आपल्या उत्तम अभिनयाने बॉलीवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासूनच, बॉलीवूडमध्ये मराठी कलाकार काम करत आहेत. अभिनयाच्या बाबतीत, मराठी कलाकार, नेहमीच अव्व्ल ठरत आले आहेत. म्हणून अनेक दिग्दर्शकांची, मराठी कलाकारच पहिले प्राधान्य असतात.
अलीकडच्या काळात, रोहित शेट्टी, आपल्या बऱ्याच सिनेमामध्ये मराठी कलाकारांना संधी देत असल्याचे चित्र आपण बघितले आहे. मराठी कलाकार, जवळपास प्रत्येक वेळी एकाच टेकमध्ये सिन देतात, त्यांची खासियत आहे, असे स्वतः रोहित शेट्टी एका मुलाखतीमध्ये बोलला होता. मात्र, केवळ आताच नाही तर, सुरुवातीपासूनच मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाने बॉलीवूडला भुरळ घातल्याचे आपण पहिले आहे.
केवळ प्रमुख भूमिका म्हणूनच नाही तर, अनेक महत्वाचे आणि साईड पात्र देखील एखाद्या सिनेमामध्ये तेवढेच महत्वाचे असते. त्यामुळे या साईड भूमिकेमध्ये अनेक मराठी कलाकाराणी काम करत आपली ओळख बनवली आहे. अश्विनी काळसेकर, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, अनंत जोग, अशोक सराफ, सुचित्रा बांदेकर, किशोर पाटकर हे काही मराठी कलाकार आहेत.
जे कधीच आपल्याला, सिनेमामध्ये प्रमुख पत्रामध्ये नाही दिसले. मात्र तरीही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. याच यादीमध्ये सुप्रिया कर्णिक यांचे देखील नाव घ्यावेच लागेल. सुप्रिया कर्णिक हे बॉलीवूडमधील मोठं नाव आहे. १९९६ साली तिसरा डोळा यामालिकेमधून, त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच मालिकेमध्ये त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.
दिवंगत अभिनेते रमेश भाटकर आणि सुप्रिया कर्णिक यादोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेमधून सुप्रियाला नवी ओळख मिळाली. सुप्रिया यांनी अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक वेगवेगळी काम केली. दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यांनतर त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेतल्या, दुकानांत सेल्सगर्ल म्हणून काम केले, शेअर मार्केट आणि रियल इस्टेट अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी काम केले.
मात्र त्यातून, शाश्वत असे मानधन मिळत नसल्याने त्यांनी थेट सौदी अरेबियाला एअरहोस्टेसचं काम देखील सुरु केले. मात्र, सौदी अरेबियामध्ये काम करत असताना बुरखा घालणे अनिवार्य होते. त्याचबरोबर, अनेक वेगवेगळे नियम होते, जे त्यांना पटले नाही. आणि सौदी अरेबियाच्या वातावरणात त्याचे मन रमले नाही.
म्हणून त्या मायदेशी परतल्या आणि यावेळी मात्र त्यांनी थेट अभिनयक्षेत्रात धडक मारली. त्याची ही धडक यशस्वी देखील ठरली. तिसरा डोळा मालिकेनंतर, त्याची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. आणि म्हणून अनेक मालिका आणि सिनेमामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळत गेली. अनेक सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे.
राजा हिंदुस्थानी, बेवफा, वेलकम, वेलकम बॅक, दे दना दे, यादें, जोडी नं १, ताल, जिस देसमे गंगा रेहता है यासारख्या बहुचर्चित सिनेमामध्ये त्यांनी काम केले. इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर देखील त्या एकट्या आहेत. त्या दोनवेळा प्रेमात पडल्या, मात्र दोन्ही वेळेस त्याना प्रेमामध्ये अपयश आले. सध्या त्या अध्यात्माकडे वाळल्या आहेत. बॉलीवूडमध्ये बऱ्याच काळापासून त्यांनी काम केले नाहीये.