सोशल मीडियावर चर्चा फक्त ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या कपडयांची, विचित्र कपड्यातील फोटो बघून आवाक व्हाल…

हॉलीवुड ते मराठी इंडस्ट्री सगळीकडेच अभिनेत्रींनी घातलेल्या कपड्यांची जोरदार चर्चा सुरू असते. या अभिनेत्री कधी काय घालतील, याचा काही नेम नाही. कान फिल्म फेस्टिवल मध्ये तर, कपड्यांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला बघायला मिळतात.
नेहमी अतिशय सुंदर दिसणारी अभिनेत्रीसुद्धा, अशा विचित्र कपड्यांमुळे कधीकधी भ’यान’क दिसायला लागते. मात्र तेव्हा तीच स्टाईल आहे असं सांगितलं जात. ऐश्वर्या असेल किंवा ब्रिटनी स्पिअर्स, सोनम कपूर असेल किंवा प्रियंका चोप्रा, आपण कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांना वेगवेगळे स्टाइल केलेले पाहिले आहे.
आणि त्यांच्या विचित्र स्टाईलचे वेगवेगळे कपडे देखील पाहिले आहेत. हे कपडे सर्वसामान्यांच्या समजण्याच्या पलीकडचे असतात. केवळ कान्समध्ये किंवा रेड कार्पेटवरच नाही तर, आजकाल बऱ्याच अभिनेत्री असे भन्नाट कपडे घालून फोटोशूट देखील करतात. आणि सगळीकडे त्याच फोटोची चर्चा चालू होते. नुकतंच सब्यसाची ची, दहा हजार किमतीची साडी प्रकाशझोतात आली होती.
माझ्या आजीकडे होती तेव्हा ती फक्त पाचशे रुपयाची होती,असे म्हणत अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. तेव्हा देखील कपड्यांची चांगलीच चर्चा रंगली होती आणि आता देखील मराठी इंडस्ट्री मधल्या या अभिनेत्रीने घातलेल्या कपड्यांचे चांगलीच चर्चा रंगली आहे. सई ताम्हणकरने मराठीच नाही तर बॉलीवुड आणि आता दाक्षिणात्य सिनेमात देखील काम करायला सुरुवात केली आहे.
मीमी सिनेमा मधून तिने बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाची सगळीकडेच कौतुक करण्यात आले आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक करणारे आता मात्र, तिला जबरदस्त ट्रोल करत आहेत. छोट्या पडद्यावरून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सई ताम्हणकर ने आपल्या कामाने कायमच चर्चा रंगवली.
एका मीडिया रिपोर्टनुसार, मराठी सिनेइंडस्ट्री मधून बॉलीवूड मध्ये जाण्यामागचे कारण सईला विचारण्यात आले, तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘तुमच्या कारकिर्दीत एकदा एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतात. हा अनुभव घेऊन तुमच्या मनाला समाधान मिळते. केवळ पैशासाठीच नाही तर, मनाच्या समाधानासाठी सुद्धा काम करणे महत्त्वाचे असते.
मला प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये आणि नवीन टीम सोबत काम करायला खूप आवडते. त्यामुळे मला खूप उभारी मिळते. हिंदी चित्रपटसृष्टीने मला स्वतःला पारखण्याची संधी दिली, त्यामुळे मी तिकडे वळले आहे.’ नवरसा सीरिजमध्ये देखील सई ताम्हणकर झळकली होती. साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती सोबत या वेबसीरीज मध्ये तिने काम केले आहे.
नुकतेच तिने काही फोटो आपल्या सोशल मीडिया वरती शेअर केले आहेत. तिच्या या फोटोना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. तिने घातलेल्या ड्रेस मध्ये गुडघ्याच्या वर येणारे वेलवेटचे गम बूट आणि ओवरसाईज टॉप यामुळे नक्कीच तिने घातलेला ड्रेस काय आहे, असा प्रश्न पडतो. तिने आईस-ब्लू कलरचा ओवर साइज शर्टसारखा ड्रेस घातला आहे.
आणि त्याच्यावरती वेलवेटचे गम बुटस आहेत, हातात घातलेल्या बँगल्स त्यावर अजिबात उठून दिसत नाहीयेत आणि त्यामुळेच या ड्रेसिंग वरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. एरव्ही आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लूकने, सर्वांना घायाळ करणारी सई यावेळी मात्र कपडे सिलेक्शन करण्याच्या बाबतीत चुकली, नि म्हणून तिच्या ड्रेसवर व लूकवर विचित्र कमेंट्स येत आहेत.