सैफ अली खान चौथ्या बाळाचा पिता होणार म्हणून त्याचा पहिला मुलगा इब्राहिम अली खानने दिली अशी प्रतिक्रिया!

सैफ अली खान चौथ्या बाळाचा पिता होणार म्हणून त्याचा पहिला मुलगा इब्राहिम अली खानने दिली अशी प्रतिक्रिया!

सैफ आणि करीनाने 2012 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा पहिला मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला. सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या घरी आणखी एक छोटासा पाहुणे येत आहे. 12 ऑगस्ट रोजी करीना कपूर खानच्या प्रेग्नन्सीची बातमी आली आणि त्यानंतर सैफ आणि करीनाचे अभिनंदन करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

दोघांनाही फॅमिली आणि मित्रांसह इंडस्ट्रीकडून शुभेच्छा मिळत आहेत. अशा परिस्थितीत सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खाननेही आपली प्रतिक्रिया दिली.

वास्तविक, सैफची बहीण सोहा अली खानने त्याचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने द गॉडफादर (The godfather) ऐवजी द क्वाड-फादर (athe Quadfather) असे लिहिलेले होते, कारण सैफ आता 4 मुलांचा पिता होणार आहे.

सोहाने करिनाचेही अभिनंदन केले आणि सुरक्षित आणि शांत राहण्याचा सल्ला दिला. सोहाच्या या पोस्टवर, इब्राहिम अली खानने अब्बा असे लिहून पुढे एक आगीचा इमोटिकॉन (emoji) टाकला आहे.

बुधवारी सैफ आणि करीनाने अधिकृतपणे याची पुष्टी केली. सैफच्या पीआर टीमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की,’आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येणार असल्याची घोषणा करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रेम आणि समर्थनासाठी सर्व शुभेच्छुकांचे आभार.’

सैफ आणि करीनाने 2012 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा पहिला मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला. सैफने प्रथम अमृता सिंगशी लग्न केले होते आणि त्यांची सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. आता नवीन बाळ जन्माला आल्या नंतर सैफ चार मुलांचा पिता होईल.

करीनाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर ती आमिर खानसोबत ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. यावर्षी रिलीज झालेल्या इंग्लिश मीडियममध्ये करीना दिसली होती.

जो इरफान खानच्या कारकीर्दीचा शेवटचा चित्रपट होता. तिने गेल्या वर्षी गुड न्यूजमध्ये अक्षय कुमारसोबत महिला मुख्य भूमिका साकारली होती. ज्यामध्ये करीना ची भूमिका एक गरोदर महिलेची होती.

admin

5 thoughts on “सैफ अली खान चौथ्या बाळाचा पिता होणार म्हणून त्याचा पहिला मुलगा इब्राहिम अली खानने दिली अशी प्रतिक्रिया!

Leave a Reply

Your email address will not be published.