सुप्रसिद्ध खलनायक डैनी ची मुलगी आहे इतकी सुंदर आणि ग्लॅमरस की, सौदर्य पाहून वेडे व्हाल…

हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच खलनायक झाले आहेत, पण डॅनी असे एकमेव खलनायक आहे जे नेपाळहून आले असूनही त्यांज अभिनय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. डॅनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे कारण डॅनी आपल्या कुटुंबाला नेहमी प्रसिद्धी पासून दूरच ठेवतात.
पण अलीकडे डॅनीच्या मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, या छायाचित्रांमध्ये डॅनीची मुलगी बार्बी बाहुलीपेक्षा कमी नाही. तर मग आम्ही तुम्हाला खलनायक डॅनीच्या गोड आणि निरागस मुलीशी ओळख करुन देणार आहोत जी दिसायला अप्सरेपेक्षा कमी नाही.
हिंदी चित्रपटांमध्ये डॅनी आपल्या संघर्षकाळात हिंदी आणि नेपाळी भाषेत गायनाचे काम करत असे. डॅनी नेपाळचे असल्याने आणि त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यांना हिंदी भाषेचेही चांगले ज्ञान होते, म्हणून सुरुवातीला डॅनीने रेडिओसाठीही बरेच काम केले आहे.
यानंतर जेव्हा त्याच हिंदी चित्रपटांत त्यांना काम मिळू लागलं तेव्हा त्यांनी रेडिओ सोडला आणि हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. खुदा गवाह, हम, चायना गेट, इंडियन इत्यादी डॅनीचे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत.
त्यात डॅनीने त्यांच्या अभिनयाची ओळख मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर निर्माण केली आणि लोकांना देखील त्यांचा अभिनय अतिशय आवडला. देशाबाहेरील असूनही डॅनीला हिंदी चित्रपटांमध्ये एक महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. जे चित्रपट उद्योग कधीच विसरू शकत नाही.
डॅनी डेन्झोंगपाला दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. डॅनीची मुलगी पेमा डेन्झोंगपा चांगल्या दिसण्याच्या बाबतीत तिच्या वडिलांवर गेली आहे. सिक्कीममध्ये जन्म झालेली पेमा बार्बी डॉल सारखीच दिसते. आणि पेमा सध्या तिच्या कारकिर्दीला एक आयाम देण्यास मग्न आहे.
पेमाचे शिक्षण लंडन व मुंबई स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून झाले आहे आणि तिने बी.ए. ची पदवी देखील घेतली आहे. पेमाला तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपटात न जाता व्यवसायात आपली कारकीर्द बनवायची आहे.
डॅनीचा मुलगा गावालादेखील वडिलांसारखे चित्रपटात न जाता व्यावसायिक म्हणून करियर बनवायचे आहे. एका चांगल्या वडिलांप्रमाणेच डॅनी देखील त्यांच्या मुलांच्या प्रत्येक निर्णयात मुलांसोबत असतात.
ते त्यांच्यावर चित्रपटात जाण्यासाठी कुठलाच दबाव आणत नाही. जरी पेमा कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा दिसण्यात कमी नसली तिने घेतलेल्या निर्णयावर वडील डॅनी यांना अभिमान वाटतो. आजही डॅनी बॉलिवूडमध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि त्यांनी नुकताच कंगना रनौत सोबत माणिकर्णिका चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.