‘सुख म्हणजे नक्की..’मध्ये होणार मराठीमधील ‘या’ सर्वात खतरनाक खलनायकाची एन्ट्री, साकारणार भैरूची भूमिका…

मनोरंजन
सध्या मराठी मालिकांनी सगळीकडेच धूम केली आहे. मराठी मालिकांचा बोलबाला सगळीकडेच बघायला मिळत आहे. अनेक मालिका, अगदी रोमांचक अशा वळणावर असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे, प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
आई कुठं काय करते, रंग माझा वेगळा, राजा -राणी ची ग जोडी, फुलाला सुगंध मातीचा, सुख म्हणजे नक्की काय असत या सर्वच मालिकांचा टीआरपी सध्या चांगलाच असल्याचं बघायला मिळत आहे. सर्वच मालिकांनी खूप वेगळी अशी वळणं घेतल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमध्ये, सध्या चांगेलच रोमांचकारी वळणं बघायला मिळत आहेत.
शालिनीच्या सगळ्या कारस्थानाना कं’टाळून, माईने तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर शालिनी चांगलीच सू’डाला पे’टल्याचं बघायला मिळत आहे. सूड घेण्यासाठी, शालिनी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे तिने दाखवून दिले आहे. शालिनी संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचत आहे. तिने आपल्या कारस्थाने घराचा आणि कंपनीचा ताबा मिळवला आणि आता मात्र तिने आपला मोर्चा शिर्के-पाटलांच्या बाकीच्या मालमत्तेकडे वळवला आहे.
आता तीच मालमत्ता मिळवण्यासाठी तिने जयदीप सोबत, कबड्डीचा डाव आखला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. मालिकेच्या या रंजक वळणावर, अभिनेता मिलिंद शिंदे यांची दमदार एन्ट्री होणार आहे. मिलिंद शिंदे यांनी यापूर्वी अनेक मराठी कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध खलनायक म्हणून, त्यांच्याकडे पाहिले जाते.
साउथमध्ये देखील त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. शासन, नटरंग, पारद, जाऊ तिथे खाऊ, नॉट ओन्ली मिसेस राऊत यासारख्या मराठी सिनेमांमध्ये ते झळकले होते. सोबतच मराठीमधील लोकप्रिय मालिका अग्निहोत्र मध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तू तिथे मी, गंध फुलांचा गेला सांगून, आई माझी काळुबाई, माझ्या नवऱ्याची बायको या सारख्या मराठी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.
आता हेच मिलिंद शिंदे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पदार्पण करणार आहेत. या मालिकेमध्ये मिलिंद, कबड्डी कोच या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव भैरु असणार आहे. याबद्दल बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले की, ‘मी या मालिकेत कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. भैरू अस या व्यक्तिरेखेचं नाव आहे. पहिल्यांदाच मी प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
दिल्लीला जेव्हा मी शिकायला होतो तेव्हा, काही काळ शाळा आणि कॉलेजमध्ये वर्कशॉप घेत होतो. त्याची मदत मला आता ही व्यक्तिरेखा साकारताना होईल. मी कबड्डी कधीच खेळलो नाहीये. शाळेत असल्यापासून फक्त आणि फक्त नाटक केले. क्रिकेट खेळायला मला आवडतं, पण जमत नाही. कधीही खेळ न खेळल्यामुळे ही भूमिका नक्कीच माझ्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.’
त्यातच पुढे ते म्हणतात, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं, ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. म्हणूनच, या मालिकेचा भाग होत असताना मला आनंद होत आहे.’ मालिकेमध्ये होणारा कबड्डी सामना पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर असलेले बघायला मिळत आहेत. म्हणून आता ही मालिका नक्की कोणते वळण घेणार हे बघणे रोमांचक असणार आहे.