‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील शालिनी आहे ‘या’ प्रसिद्ध मराठी अभेनेत्रीची बहिण…

आपल्या मराठी सिनेसृष्टीमधे, अनेक वेळा आपल्याला एखाद्या कलाकाराचा चेहरा दुसऱ्या एखाद्या कलाकारसोबत मिळता जुळता किंवा सारखा वाटतो. मात्र, आपण त्याकडे फारसे काही लक्ष देत नाही. अनेक वेळा त्या कलाकारांमध्ये आपआपसांत नाते असते मात्र त्याबद्दलचा खुलासा आपल्यासमोर लवकर होत नाहीच.
शोले सिनेमातील ‘कितने आदमी थे ?’ या प्रश्नावर ‘दो थे सरकार’ असे उत्तर देणारे विजू खोटे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. त्यांच्या बहीण म्हणजेच शुभा खोटे या देखील तेवढ्याच प्रसिद्ध अश्या कलाकार आहेत. मराठी सह असेंक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये देखील या दोन्ही भावा-बहिणीच्या जोडीने काम केले आहे. त्यांची अनोखी विनोद शैली आणि खास टायमिंग यामुळे त्या दोघांना देखील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखले जात असे.
त्यांच्या पाठोपाठ आपण अनेक असे भाऊ बहीण यांची जोडी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिली आहे. अलीकडच्या काळात तर, अश्या अनेक जोड्या बघायला मिळतात. शशांक केतकर याची बहीण दीक्षा केतकर हि देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. मराठी मालिकांमधून आता ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
त्याचबरोबर मृणाल देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी बहिणींनी देखील आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला आणि आपल्या प्रेक्षकांना वेडं लावलं आहे. या दोघींचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. अश्या मराठी सेलेब्रिटी सिस्टर्स हि जणू नवीन ट्रेंड च सुरु झाली आहे.
त्यामुळे आपल्याला कोणत्या तरी मालिकेमध्ये किंवा सिनेमामध्ये कोणाची तरी बहीण किंवा भाऊ बघायाला मिळतोच आहे. मात्र आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नसते. तसेच या दोन अतिसुंदर कलाकार एकमेकींच्या बहिणी आहेत हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. आणि त्या म्हणजे सोनाली खरे व माधवी निमकरस.
सुख म्हणजे काय असत हि मालिका सध्या टीआरपी मालिकेमध्ये धमाल करत आहे. या मालिकेमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे. याच मालिकेमध्ये शालिनीची म्हणजेच निगेटिव्ह पात्र रेखाटणारी माधवी खरे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिची बहीण आहे.
माधवी आणि सोनाली दोघी देखील मावस बहिणी आहेत. आणि चित्रपटसृष्टीकडे वळण्यासाठी सोनालीचा कारणीभूत आहे माधवी सांगते. सोनाली खरे ला आपण अनेक मराठी सिनेमामध्ये बघितले आहे, ती ज्या पण सिनेमामध्ये आणि मालिकेमध्ये काम करते त्यात आपली वेगळी अशी छाप सोडून जाते. सावखेड एक गाव, चेकमेट अश्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या सोनालीने काही हिंदी सिनेमामध्ये देखील काम केले आहे.
तिच्याच पावलावर पॉल टाकत तिच्या मावस बहिणीने देखील चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. २००९ मध्ये बायकोच्या नकळत या सिनेमामधून माधवीने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केला आणि त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये तिने काम केले. नवरा माझा भवरा, धावाधाव अश्या अनेक भूमिका तिने साकारल्या मात्र तिला खरी ओळख मिळाली ती शालिनीच्या भूमिकेमध्येच.
भल्या मोठ्या शिर्के कुटुंबाची मोठी सून म्हणून सुंदर आणि तेवढीच फुशारकी करणारी या पत्रामध्ये तिने आपल्या अभिनयाचा रंग एकत्रित केला आणि ते पात्र सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे. यापूर्वी देखील अनेक सिनेमामध्ये माधवी ने काम केले आहे मात्र, शालिनीताई शिर्के म्हणून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या दोघीही बहिणी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस अंदाजाचा तडाखा कायमच या दोघी लावतात.