‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका, ध’क्कादा’यक कारण आले समोर..

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका, ध’क्कादा’यक कारण आले समोर..

मनोरंजन

माघील अनेक वर्षांपासून, छोटा पडदा म्हणजेच मालिकाविश्वाने सर्वत्र आपले वर्चस्व प्रस्थपित केल्याचे आपण बघत आहोत. मराठी मालिका असतील किंवा हिंदी मालिका, प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी मालिका बघितलीच जाते. माघील बऱ्याच दिवसांपासून, मराठी मालिकांनी मात्र, छोट्या पडद्यावर आपले वर्चस्व प्रास्थापित केल्याचे बघायला मिळत आहे.

अनेक मराठी मालिकांचे टीआरपी, हिंदी मालिकांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे, अनेक मराठी मालिका आता पुन्हा इतर भाषेंमध्ये बनत आहेत. मराठी मालिका, ‘आई कुठं काय करते’ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या मालिकेचा टीआरपी, सुरुवातीपासूनच चांगला असल्याचे बघायला मिळत आहे.

त्यामुळे हिंदी, आणि इतर भाषेत देखील ही मालिका बनवली आहे. त्याचबरोबर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेने देखील अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच, हि मालिका देखील पांड्या स्टोअर्सच्या नावाने हिंदीमध्ये बनली आहे. त्याचप्रमाणे, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच चांगल्याच चर्चा रंगवल्या होत्या.

मालिका सुरु झाल्यानंतर तर, सुंदरा मनामध्ये भरली, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. खूप कमी वेळेत या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमावली. त्यामुळेच आता हि मालिका देखील गुजराती भाषेमध्ये पुन्हा बनणार आहे. सुंदरा मनामध्ये भरली, या मालिकेसोबतच, त्यामधील सर्वच पात्रांनी देखील चांगलीच लोकप्रियता कमावली.

मालिकेच्या प्रमुख पात्रांसोबतच, हेमा जहागीरदार या पत्रानेसुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पण माघील काही दिवसांपासून, हेमा जहागीरदारच्या भूमिकेत दुसरीच अभिनेत्री बघायला मिळत आहे. तेव्हा, पहिली हेमा कुठं गेली, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. हेमाची भूमिका, अभिनेत्री प्रमिती प्रीत साकारत होती. यामध्ये तिला, चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली होती.

प्रमिती प्रीतने यापूर्वी, संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत, काम केलं होत. तू माझा सांगाती मालिकेमध्ये, तिने संत तुकाराम महाराजांच्या, बायकोची अर्थात आवलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी, तिचे काम सर्वाना खूप जास्त आवडले होते. त्याच पत्रामुळे तिला एक नवी ओळख मिळाली.

त्यानंतर काही मराठी सिनेमामध्ये देखील काम केले आहे. सुंदरा मनामध्ये भरली, या मालिकेत देखील तिच्या कामाचे चांगले कौतुक झाले. मात्र तिने एका मोठ्या कारणास्तव, ही मालिका मध्यातच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल, मेकर्स जरी शांत असले तरीही, तिने स्वतः याचे कारण सांगितले आहे. प्रमिती प्रितने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

प्रमितीने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की,’माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम वेळांपैकी, काही वेळ मी सुंदरा मनामध्ये भरलीच्या सेटवर घातला. माझ्यासाठी तो काळ कायमच खूप महत्वाचा आणि सुंदर असा ठरणार आहे. ही मालिका सोडताना मला खूप दुःख होत आहे.

या मालिकेमुळे तुम्ही मला जे प्रेम दिल ते खूप खास होत..मात्र मला उध्दभवलेल्या त्रा’सामुळं मी ही मालिका सोडत आहे. तुमच्या शुभेच्छाने नक्कीच मी पुन्हा एका भूमिकेत तुमच्या भेटीला येईल.’ माघील काही वेळापासून, प्रमितीच्या चेहऱ्यावर इ’न्फेक्शन झालेल, बघायला मिळत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *