सुंदरा मनामध्ये भरली : अभिमन्यू लतीकाच्या प्रेमाला नंदिनी नावाचे ग्रहण, मालिकेत होणार ‘या’ सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री..

सुंदरा मनामध्ये भरली : अभिमन्यू लतीकाच्या प्रेमाला नंदिनी नावाचे ग्रहण, मालिकेत होणार ‘या’ सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री..

मालिका म्हटलं की, वेगवेगळे रोमांचक वळण हे येणारच. प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा प्रेक्षकांना वाटायला लागते की,आता सर्व ठीक होऊ मालिका संपेल नेमकं तेव्हाच मेकर्स कोणतातरी एक ट्विस्ट मालिकेत टाकतात आणि मग ती मालिका अजूनच रोमांचक वळण घेते.

जसे की, रंग माझा वेगळा या मालिकेत जेव्हा डिलीवरी च्या आधी दीपा आपल्या सासूच्या बोलण्यावरून कार्तिक सोबत राहायला लागते, तेव्हा आता सगळं ठीक होईल असं प्रेक्षकांना वाटत होते. मात्र त्याही मालिकेने एक वेगळेच वळण घेतले आणि आता पुढे काय होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा अनेक मालिका आहेत या अनपेक्षित वळण घेतात.

सध्या टीआरपी चार्टवर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने धुमाकूळ घातला आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येणारी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने इतकी जास्त लोकप्रियता प्राप्त केली की, आता ही मालिका गुजराती भाषेमध्ये देखील बनणार आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमांचक असे वळण आलेले आहे.

मालिकेतील अभिमन्यू, लतिका ला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी माहेरी म्हणजेच बापू च्या घरी जातो. अभिमन्यू आपल्या सासर्‍याला म्हणजेच बापूला पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ती काम आहे जितकी सुखी आहे तेवढेच सासरी देखील मी तिला सुखी ठेवेल असेसुद्धा म्हणतात मात्र बापू काहीच ऐकत नाही.

अभिमन्यूच्या पूर्वीच्या वागणुकीमुळे बापू त्याच्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ ठरतात, त्यामुळे अभिमन्यू ला तिथून जाण्यासाठी सांगतात. इकडे अभिमन्यू चे आई वडील दोघेही आपल्या मुलाचा मोडलेला संसार पुन्हा जुळवा, आणि अभिमन्यू लतिका सोबत राहावेत अशी इच्छा व्यक्त करतात. सध्या मालिकेत घडणाऱ्या या घडामोडीत आता एक नवीन पात्राच्या इंट्री चर्चा सुरू आहे.

नंदिनी असे या पात्राचे नाव आहे. तर हे पात्र कोण रेखाटन याची सगळीकडेच चर्चा आहे. या नवीन पात्राची म्हणजेच नंदिनीची भूमिका आदिती द्रविड साकारणार आहे. यापूर्वी आदितीने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ईशा ची म्हणजेच शनाया च्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेदरम्यान आज आदिती आणि रसिका या दोघींची पण अगदी घट्ट मैत्री झाली.

त्यामुळेच त्यांनी या म्युझिक व्हिडिओ अल्बम मध्ये त्या दोघी झळकल्या होत्या. अदिती एक गीतकार देखील आहे लिहिलेले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेत तुळसा ची म्हणजेच बाबासाहेबांच्या मोठ्या बहिणीची भूमिका तिने साकारली होती. एवढ्या लहान वयात एवढी मोठी भूमिका इतक्या उत्तम प्रकारे रेखाटली म्हणून तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

अदिती सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते. आपल्या वेगवेगळे प्रोजेक्ट ची माहिती आदिती यामधून सर्वांसोबत शेअर करत असते. आता सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेत आदिती एंट्री घेत आहे. ही भूमिका निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. मात्र नंदिनी मुळे लतिका आणि अभिमन्यूच्या आयुष्यामध्ये नक्कीच रोमांचक वळणे येणार नक्की.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.