सीता मातेच्या भूमिकेसाठी करीनाचा पत्ता कट ? आता ‘ही’ प्रसिद्ध हिंदू अभिनेत्री साकारणार भूमिका ?

खूप दिवसानंतर बॉलिवूडची बेबो करीना कपूर पुनरागमन करण्यासाठी वाट बघत आहे आणि तिला काही चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या आहेत. परंतु पुनरागमन करण्यापूर्वी ती एका वा’दाच्या भो’वऱ्यात सा’पडली आहे. तिला एका पौराणिक कथेची ऑफर देण्यात आली होती त्या चित्रपटात काम करण्यासाठी तिने तब्बल 12 को’टी रुपयांची मागणी केली.
आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती भगवान श्रीराम यांची पत्नी माता सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. परंतु ही बातमी बाहेर येताच तिच्यावि’रोधात संता’पाची लाट उसळली करीना कपूर माता सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नाही असं म्हणत नेटकरांनी तिच्या विरोधात बायकोट करीन असा प्रचार सुरू केला.
नेमके प्रकरण आहे कि बॉलीवूडमध्ये रामायणावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट सीतेच्या व्यक्तिरेखेवर केंद्रित असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होताना दिसतेय. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर ही भूमिका करणार अशी चर्चा होती.
जेव्हा ती बातमी सगळीकडं पसरली तेव्हा त्यावरुन मोठा ग’दारो’ळ झाला होता. आता ती भूमिका बॉलीवूडमधील दुसरी अभिनेत्री करणार आहे. तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा विचार होतो आहे. यासंबंधी त्या चित्रपटाचे लेखक यांनी माहिती दिली आहे.
त्याचं काय आहे, सीतेची भूमिका करण्यासाठी करिनानं बारा कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर करिनाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या बाबत आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे करिनाचा सीतेच्या भूमिकेसाठी विचार होणार नाही. तिची जागा बॉलीवूडच्या दुस-या अभिनेत्रीनं घेतली आहे.
कंगना राणावत सीतेची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आता माहिती अशी आहे की, या चित्रपटाच्या निर्मात्यांना कंगना राणावतला कास्ट करायचे होते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सीता द इनकार्नेशन च्या निर्मात्यांनी कंगनाला या चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे.
चित्रपटाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसादनं कंगनाला चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे. त्यानंतर आता अशी चर्चा आहे की, करिनाची जागा कंगना घेणार आहे. मात्र निर्मात्यांनी या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीता द इनकार्नेशनसाठी अजूनही करिनाचे नाव चर्चेत आहे. मात्र मेकर्सन अद्याप करिनाशी देखील संपर्क साधलेला नाही. केवी विजयेंद्र यांना असे वाटते, नव्या भूमिकेसाठी कंगना ही परफेक्ट अभिनेत्री आहे. मात्र त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या विजयेंद्र आरआरआर मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजमौली हे करणार आहेत.