सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्यूपुर्वी काही तास आधी काय घडलं?; हिंदुस्तानी भाऊनं सांगितलं सत्य…

सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्यूपुर्वी काही तास आधी काय घडलं?; हिंदुस्तानी भाऊनं सांगितलं सत्य…

या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच २ सप्टेंबरला बिग बॉस १३चा विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकस्मात नि’धन झाले.

त्याच्या प्रत्येक चाहत्याला ही गोष्ट चटका लावून जाणारी आहे. त्याची एक चाहती तर थेट कोमामध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे आहे. सकाळी सिद्धार्थ झोपेतून उठत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तो उठत नव्हता.

त्यामुळे त्यांनी त्याला तातडीने रु’ग्णाल’यात दाखल केले. रु’ग्णाल’यात दाखल केल्यानंतर डॉ’क्टरांनी त्याला तपासून मृ’त घो’षित केले. त्याचे नि’धन हृ’दयवि’काराने झाले असावे असे, डॉ’क्टरांचे म्हणणे होते. मात्र, याबाबतचा अहवाल अजूनही राखीव ठेवण्यात आलेला आहे.

आणखी काही दिवसानंतर अहवाल येईल. त्यानंतर त्याच्या मृ’त्यूचे खरे कारण कळेल, असेही सांगण्यात येत आहे. टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुःख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सुरुवातीपासूनच एक मोठं नाव होतं.

मात्र मध्ये त्याने बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर त्याला भरघोस यश मिळालं. बिग बॉस 13 मध्ये त्याची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती की, केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्याने तो रियालिटी शोदेखील जिंकला. नंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. अनेक म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये तो झळकू लागला. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र परिवार खूप मोठा आहे.

सिद्धार्थच्या जाण्यानंतर अनेकजण त्याच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत आहेत. अशातच बिग बॉस १३ मधील स्पर्धक विकास पाठक ज्यांना सगळेच हिंदुस्तानी भाऊ नावानं ओळखतात. तेदेखील सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित नि’धनानंतर त्याच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेण्यासाठी घरी पोहचले होते.

या भेटीनंतर हिंदुस्तानी भाऊनं माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, मृ’त्यूच्या काही तास आधी सिद्धार्थ शुक्लासोबत काय घ’डलं होतं. हे त्याने आई रिताच्या हवाल्याने माध्यमांशी शेअर केले. सिद्धार्थनं १-२ सप्टेंबरच्या रात्री काय केलं होतं? त्यावर हिंदुस्तानी भाऊ म्हणाला की, सर्वकाही ठीक होतं. सिडनं डिनर केलं आणि झोपायला त्याच्या रुममध्ये गेला.

रात्री ३.३० वाजता सिद्धार्थनं त्याच्या आईला एक ग्लास पाणी मागितलं त्याला अ’स्वस्थ वाटू लागलं होतं. आईने त्याच्या पाणी आणलं. त्याने पाणी प्यायल्यानंतर आईस्क्रीमही खाल्लं आणि झोपी गेला. सिद्धार्थ जिमचं वर्कआऊट करण्यासाठी सकाळी १० वाजता उठतो परंतु सकाळी अलार्म वाजल्यानंतरही सिड उठला नाही. तेव्हा आई त्याच्या रुममध्ये उठवायला गेली असता तो झोपेतून उठलाच नाही त्यानंतर सर्व समोर आलं.

बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थसोबत होता हिंदुस्तानी भाऊ सिद्धार्थ शुक्ला याच्या नि’धनाबद्दल हिंदुस्तानी भाऊने इन्स्टावर पोस्ट करत त्याला श्र’द्धांज’ली वाहिली होती. तो म्हणाला की, RIP मित्रा, कायम आठवणीत राहशील. हिंदुस्तानी भाऊ आणि सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉस १३ या कार्यक्रमात सहस्पर्धक होते.

कार्यक्रमावेळी हिंदुस्तानी भाऊ आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात अनेकदा ख’टके उ’डाले होते. “मित्रा, तू लवकर गेलास…!” मृ’त्यूपूर्वी सिद्धार्थ शुक्लासोबत अखेरचा फोन संवाद मला माफ कर भावा… अनेक टीव्ही सेलिब्रिटी सिद्धार्थबद्दल बोलताना भावुक झालेत.

‘बिग बॉस 14’फेम एजाज खान यानेही सिद्धार्थच्या नि’धनावर शोक व्यक्त केला. केवळ शोक नाही तर त्याने सिद्धार्थची मोठ्या मनानं माफीही मागितली. यात तो लिहितो, ‘मी टोकन गेश्चरवर विश्वास ठेवत नाही. मला तुझ्याशी बोलायंच होतं, पण आता मी तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही. सर्वप्रथम मी तुझी माफी मागू इच्छितो.

मी तुला फोन करण्याचा वा भेटण्याचा प्रयत्न केला नाही. काय कारण होतं माहित नाही. कदाचित मी माझ्या कामात व्यग्र होतो. आपण कुठं ना कुठं भेटूच, असं मला वाटलं होतं. पण आपली भेट झालीच नाही. यासाठी मी स्वत:ला कसं माफ करेल, माहित नाही. मला माफ कर भावा असं एजाजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *