सल्या-बाळ्याची ‘सैराट’ जोडी पुन्हा दिसणार एकत्र, ‘या’ मालिकेतून करत आहेत छोट्या पडद्यावर एन्ट्री..

सैराट एक असा सिनेमा होता, ज्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कमालीची लोकप्रियता कमवली. सैराट सिनेमा प्रदर्शित होताच, चाहत्यांनी अक्षरशः त्याला डोक्यावर उचलून धरलं होत. या सिनेमाचे नाव घेताच आपल्यासमोर काय उभं राहत? आर्ची आणि पारश्याची अलगद खुलत जाणारी प्रेमकहाणी.
त्यामध्ये आलेले संकट, आणि त्या सर्व संकटावर मात करुन, म’रेपर्यंत एकत्र राहिलेले आर्ची व परश्या. या सर्वांसोबत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले सुंदर गाणे, यामुळे तर या सिनेमाचा स्तरच वेगळा झाला होता. या सिनेमामध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला होता. सर्वच कलाकार त्याच्या भूमिका देखील चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या.
त्यामध्ये परशा आणि त्याच्या मित्रांची जोडी तर जरा जास्तच भाव खाऊन गेली होती. आजही त्या मैत्रीचे लाखो चाहते आहेत. म्हणून खास चाहत्यांच्या मागणीवरुनच, आता ही लोकप्रिय ठरलेली मैत्रीची जोडी पुन्हा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे. सल्या आणि बाळ्याची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी ही जोडी, छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
झी मराठीवर नव्याने सुरु होणारी मालिका मन झालं बाजींद मध्ये आता सल्या आणि बाळ्या म्हणजे तानाजी व अरबाज दोघेही आपल्या कॉमेडीचा डबल डोस घेऊन येत आहेत. गुलाबी प्रेमाच्या अनेक कथा आजवर आपण पहिल्या आहेत. मात्र आता कृष्णप्रेमाचा पिवळा रंग घेऊन हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच ट्रेलर अल्पावधितीच लोकप्रिय झाले आहे.
त्याच्या प्रोमोमधेच रोमँटिक जादू पसरवण्यात मेकर्सला यश आले आहे. मात्र आता सर्व रसिकांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे, की सैराटची धमाल जोडी यामध्ये आपल्या विनोदाने सर्वांचे मनोरंजन करणार आहे. तानाजी आणि अरबाज या जोडीचा देखील मोठा चाहतावर्ग आहे, आणि आता छोट्या पडद्यवर नक्की ते काय कमाल करतात हे बघण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
अभिनेता वैभव चव्हाण आणि श्वेता राजन हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहेत. प्रोमोमध्ये पिवळ्या रंगात न्हाऊन जात, या दोघांनी कृष्णप्रेमाच्या पिवळ्या रंगाची आठवण करुन दिली आहे. त्यादोघांची केमिस्ट्री देखील चांगली दिसत आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करत झी मराठीच्या अधिकृत अकाउंटवर त्याची माहिती देखील दिली आहे.
त्यामध्ये मालिकेचे वर्णन करताना मेकर्स लिहतात की,’परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा आणि माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे.
यांच्या बाजींद प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.’ सुंदर उमलत जाणारं प्रेम आणि जोडीला तानाजी आणि अरबाज जोडीची तुफान कॉमेडी, यामुळे प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन होणार असंच दिसत आहे.