सरुआजींच्या ‘या’ संवादामुळं, देवमाणूस वादाच्या भोवऱ्यात ! म्हणाली; ‘आपलीच मोरी आणि *** चोरी, म्हणून मेकर्सने घेतला हा निर्णय..

सरुआजींच्या ‘या’ संवादामुळं, देवमाणूस वादाच्या भोवऱ्यात ! म्हणाली; ‘आपलीच मोरी आणि *** चोरी, म्हणून मेकर्सने घेतला हा निर्णय..

रुपेरी पडदा असले किंवा छोटा पडदा असेल त्यावर काय दाखवले जातं हे म्हत्वाच ठरतं. अनेकवेळा या पाडद्यावर काही अश्या गोष्टी दाखवल्या जातात ज्यामुळे समाजाचे नुकसान होतं. अर्थातच मेकर्सचा तसं काही दाखवण्याचा उद्देश नसतो, मात्र चुकून एखादया गोष्टी कडे लक्ष जात नाही किंवा त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो असं ध्यानात येत नाही, परिणामी त्याचा चुकीचा अर्थ निघतो.

या चुकीच्या एखाद्या वक्तव्यामुळं किंवा सीनमुळं संपूर्ण मालिकेवर किंवा सिनेमावर सं’कट ओढवते आणि वाद सुरु होतो. सध्या झी मराठीवरील देवमाणूस मालिका चांगलीच वा’दाच्या भो’वऱ्यात सा’पडली असल्याचं दिसत आहे. सुरुवातीपासूनच ही मालिका कोणत्या तरी कारणामुळं चर्चेत आहे. चांगुलपणाचा बुरखा पांघरून, घात करणा-या व्यक्तींच्या वृत्तीवर भाष्य करणारी ही मालिका झी मराठीवर आली.

अगदी कमी वेळात या मालिकेने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलेली आहे. केवळ मालिकाचं नाही तर या मालिकेतील जवळपास प्रत्येक व्यक्तिरेखा देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. सध्या तरी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आणि मेकर्स आई कलाकार हे यश चांगलेच एन्जॉय देखील करत आहेत.

मात्र, या मालिकेनं आता आपणहून एक वाद अंगावर ओढवून घेतला आहे. दरम्यान, झी मराठी वाहिनीनं या समोर आलेल्या वादात कोणतेही तथ्य नसून तो नुसता एक खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘देवमाणूस’मधील सरू आज्जीच्या तोंडच्या एका म्हणीने हा वाद सुरु केला. होय, सरू आजीच्या एका संवादामुळं या मालिकेवर जोरदार टीका होत आहे.

१३ जुलैला प्रक्षेपित झालेल्या ‘देवमाणूस’च्या भागात सरू आजीच्या तोंडी एक म्हण दाखवन्यात आली. ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ आशयाची एक म्हण सरू आजी एका दृश्यात बोलताना दिसली. यावरूनच सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली आणि वेगळाच ‘राडा’ सुरू झाला. या दृश्याचा आणि सरू आजीच्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या संवादात असलेल्या या व्हिडियोमध्ये अ’श्ली’ल अपशब्द कानावर पडत असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. आणि यानंतर मालिकेवर जोरदार टीका सुरू झाली. दरम्यान मालिका आणि वाहिनीवर टीका सुरू होताच, झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी याबद्दल लगेच संपूर्ण खुलासा केला.

‘मालिकेतील संवादात कोणत्याही प्रकारचा अ’श्ली’ल शब्द वापरण्यात आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हा निव्वळ खोडसरपणा आहे. वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दामच काही खास व्यक्तिविशेषांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आला आहे. त्यात ज्याप्रकाराचा दावा केला जातोय त्यात काहीही तथ्य नाही. झी मराठी एक जबाबदार वाहिनी आहे आणि गेली कित्येक दशक आम्ही याच नात्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलो आहे.

आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अ’श्ली’ल संवादाचा वापर केलेला नाही किंबहुना पुढेही असं काही होणार नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये, म्हणून आमची एक वेगळी टीम सतत कार्यरत असते. ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे, त्या एक ज्येष्ठ आणि जबाबदार अभिनेत्री आहेत. तेव्हा अशाप्रकारचा संवाद त्या स्वत:च चुकूनदेखील बोलणार नाही,’ असं मयेकर म्हणाले.

तसं तर, देवमाणूस’ मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच भाव खाऊन जातय. आजीला दिसत नाही आणि तरीही आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर नेहमीच चांगले लोकप्रिय झाले आहेत. सरु आजीच्या म्हणींनी सोशल मिडीयावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतो.

सोशल मिडीयावर आजीच्या फोटोंसह या म्हणी व्हायरल होतच असतात आणि त्यावर लाईक्सचा वर्षाव होतो. अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी या सुरू आजीची भूमिका साकारली आहे. रुक्मिणी आता ७० वर्षांच्या आहेत. याआधी देखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘देवमाणूस’ या मालिकेतील सरु आजींच्या भूमिकेमुळं त्या अचानकच प्रकाशझोतात आल्या.

मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी, दुर्गा यांसारख्या मालिका आणि जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी यापूर्वी भूमिका साकारल्या आहेत. सुरू आजींनी ‘दबंग’ चित्रपटात सलमान खानसोबतसुद्धा काम केलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.