“श्वास” चित्रपटातील ‘हा’ बालकलाकार झालाय मोठा, फिल्म इंडस्ट्री सोडून आता करतोय ‘हे’ काम, पहा आता ओळखनेही झालेय मुश्किल…

“श्वास” चित्रपटातील ‘हा’ बालकलाकार झालाय मोठा, फिल्म इंडस्ट्री सोडून आता करतोय ‘हे’ काम, पहा आता ओळखनेही झालेय मुश्किल…

संदीप सावंत दिग्दर्शित श्वास हा चित्रपट सर्वांनी बघितलेला असेल परंतु जर तुम्ही हा चित्रपट बघितला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा एक मराठी चित्रपट असून या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच हा चित्रपट इतका हृदयस्पर्शी आहे की ह्या चित्रपटाचे अनेक भाषांमध्ये रिमेक देखील बनवण्यात आले होते.

हा चित्रपट बंगाली तमिळ हिंदी या भाषांमध्ये रीमेक करून प्रसिद्ध करण्यात आला होता. श्वास या चित्रपटाला 2004 साली सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ तीस दिवसात करण्यात आले होते.

या चित्रपटाचे चित्रीकरण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतल्या केइएम या रु-ग्णालयात करण्यात आले होते. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत मराठी चित्रपट सृष्टीतील अरुण नलावडे, अश्विन चितळे, संदीप कुलकर्णी, अमृता सुभाष, गणेश मांजरेकर, अश्विनी गिरी हे दिग्गज कलाकार दिसले होते.

हा चित्रपट अतिशय सुंदर विषयावर बनवण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये एका आजोबाची व नातवाची कथा दाखवण्यात आली आहे. आपल्या नातवाला आपले डो’ळे गमवावे लागणार आहे हे कळाल्यानंतर एका आजोबाची काय हालत होती हे या चित्रपटांद्वारे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात नातवाच्या भूमिकेत ‘अश्विन चितळे’ हा बालकलाकार म्हणून दिसला होता. तर आजोबा च्या भूमिकेत अरुण नलावडे दिसले होते.

श्वास या चित्रपटात अश्विनने एका खूपच निरागस मुलाची भूमिका साकारली होती त्यामुळे तो खूपच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याने हिंदी चित्रपटात देखील काम केले होते, नागेश कुकुनूर दिगदर्शीत आशाये या हिंदी चित्रपटात अश्विनने काम केले आहे. अश्विनने काम केलेल्या श्वास चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत, चित्रपटातील सर्वोत्तम बालकलाकार म्हणून देखील अश्विनला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अश्विन ने हिंदी व्यतिरिक्त अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात काम केले आहे, टॅक्सी नंबर 9122, देवराई, जोर लगा के हैय्या, अहिस्ता अहिस्ता अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये अश्विन दिसला होता. परंतु ह्या काही चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर अश्विन परत कुठल्या चित्रपटात दिसला नाही, तर मग जाणून घेऊया आजच्या या लेखातून अश्विन चितळे नेमकी आता करतो तरी काय व तो नेमकी दिसतो तरी कसा.

मूळचा पुण्याच्या असलेल्या अश्विन ने पुण्यातीलच नूतन मराठी विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अश्विन ने टिळक महाराष्ट्र यूनिव्हर्सिटीतून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. अश्विन ने भूगोल व फिलोसोफी या विषयांमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

अश्विन ने एक अश्विन हेरिटेज नावाची टूर्स कंपनी देखील सुरू केली आहे ज्याद्वारे तो पर्यटकांना विविध ठिकाणी भेट देण्यास मदत करत असतो. अनेक पर्यटन प्रेमी त्याच्याकडे विविध टूर्स ला जाण्यासाठी येत असतात. श्वास या चित्रपटाद्वारे दिसलेला अश्विन पुन्हा कुठल्याही चित्रपटांमध्ये दिसला नाही.

तो फक्त चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनच दिसला होता. आता त्याचा लूक पूर्णपणे बदलून गेला आहे लहानपणी दिसलेला अश्विन आता मोठ्यापणी खूपच स्मार्ट आणि हँडसम दिसतो आहे. अश्विन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पर्यटनाचे काही फोटो शेअर करत असतो तसेच स्वतःचे देखील काही फोटोज शेअर करत असतो. अश्विन ला 2004 मध्ये सर्वोत्तम राष्ट्रीय बाल कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *