‘शोले’ चित्रपटात काम करण्यासाठी सचिन पिळगावकरांना पैसे नाही तर मिळाली होती ‘ही’ वस्तू..

आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर एक वेगळी छाप उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले. त्यानंतर सचिन यांना मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देण्यात आला होता.
सचिन पिळगावकर मराठी इतकेच हिंदी चित्रपटात देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजार अनेक हिंदी चित्रपटात देखील अनेक भूमिका केल्या आहेत आणि त्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या समरणात आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील राजेश खान्नांपासून अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्ग्ज कलाकारांसोबत काम केले आहे.
आज १७ ऑगस्ट रोजी सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे. सचिन यांचा जन्म १९५७ रोजी मुंबई येथे झाला. सचिन यांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये आणि काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
सचिन यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रविंद्र नाथ टागोर यांच्या नाटकावर आधारित ‘डाकघर’ या हिंदी चित्रपटात काम केले. त्यानंतर १९८२मध्ये सचिन यांनी ‘नदिया के पार’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून सचिन खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यानंतर सचिन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मूख्य भूमिका साकारली.
चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच सचिन यांनी टीव्ही मालिकांमध्ये ही काम केले. २००६मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित झालेली मालिका ‘तू तोता मैं मैना’मध्ये काम केले. ही मालिका त्यावेळी सर्वात लोकप्रिय ठरली होती. ‘मायबाप’ या वडिलांनी निर्मिती केलेल्या चित्रपटातून सचिन यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण केले.
सचिन यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये २०हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी बॉलिवूडमधील राजेश खान्नांपासून अमिताभ बच्चन यांच्यासह काम केले आहे. ‘बेस्ट चाइल्ट आर्टिस्ट’ म्हणून सचिन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘शोले’मध्येदेखील सचिन यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी अहमदची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मानधना ऐवजी फ्रिज देण्यात आला होता.
त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सचिन यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘नवरी मिळे नवऱ्या’ला या मराठी चित्रपटाच्या सेटवर सचिन यांची ओळख अभिनेत्री सुप्रिया पिळगावर यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया देखील अभिनय क्षेत्रात आपले करियर करताना दिसत आहे तिनेही अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम केले आहे. आणि विशेष म्हणजे तिने शाहरुख खान सोबत फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.