शुटिंगदरम्यानच अ’टॅक आल्याने सेटवरचं कोसळली ‘ही’ अभिनेत्री, हिंदुजा रुग्णालयात केलं दाखल..

माघील दोन वर्षांपासून सगळीकडेच सर्व काही बंद होते. कोरोनाकाळात ताळेबंदी असल्यामुळं, अनेक कंपन्या, उद्योगधंदे बंद होते. याच काळात अनेक सिनेमाचे चित्रकरण रद्द झाले किंवा लांबणीवर पडले होते.
आता मात्र सर्व नियम पाळत, जनजीवन काहीसे सुरळीत सुरु झालं आहे. सगळीकडेच सर्व निर्बंध पाळत काम सुरु आहे. तसे अनेक थांबलेल्या सिनेमानं देखील चित्रीकरणाची अनुमती देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक सिनेमाचे चित्रीकरण पुन्हा नव्याने सुरु झाले आहे.
प्यार का पंचनामा सिनेमाच्या सिरीजचा दिग्दर्शक लव रंजन यांनी देखील आपल्या नवीन सिनेमाचे चित्रीकरण सुरु केले आहे. लव रंजन यांनी प्यार का पंचनामा भाग १-२, आकाश वाणी, सोनू के टिटू की स्विटी, दे दे प्यार दे, छलांग या सारखे सिनेमा बनवले आहेत. नुसरत भरुचा ही लव रंजन यांची आवडती अभिनेत्री आहे, सोबतच ती त्यांच्यासाठी लकी देखील असे असं ते समजतात.
म्हणून त्यांच्या जवळपास सर्वच सिनेमामध्ये नुसरत असते. आता देखील बनवत असलेल्या सिनेमामध्ये नुसरतच प्रमुख भूमिकेमध्ये आहे. सर्व परवानगी घेऊन, नियमांचे पालन करत त्याच्या येत्या सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. माघील २०-२५ दिवसांपासून सिनेमाचे चित्रीकरण सुरु आहे. मात्र, यातच नुसरतची प्रकृती काहीशी खालावली असून ती आ’जारी आहे.
तिला डोकेदुखी आणि शरीराचे इतर त्रास देखील होत आहेत. मात्र या स्थितीमध्येसुद्धा ती सिनेमाचे चित्रीकरण करतच आहे. आणि अचानकच आज तिला शूटिंग सुरु असताना, ती चक्कर येऊन खाली कोसळली. तिला चक्कर येताच डॉ’क्टरांकडे घेऊन जाण्यात आले, तेव्हा तिला व्हर्टिगोचा अ’टॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
बऱ्याच दिवसांपासून तिची प्रकृती खराब आहे, तिला प्रचंड अशक्तपणा होता. आणि त्यात तिला व्हर्टिगो अ’टॅक आल्याने सेटवर सर्वांच्याच चिंता वाढवल्या होत्या. दरम्यान, आता तिची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ’क्टरांनी सांगितले आहे. मात्र तिला बेडरेस्टच सांगितली आहे. पुढील काही दिवस तिला, कोणातही काम करता येणार नाही.
शिवाय तिने कोणत्याही प्रकारचा मा’नसि’क त्रा’स घेऊ नये असेही, डॉ’क्टरांनी सांगितले आहे. नुसरत भरुचाने प्यार का पंचनामा, आकाश वाणी, ड्रिमगर्ल, सारख्या हिंदी सिनेमामध्ये काम केलं आहे. शिवाय काही साऊथच्या सिनेमामध्ये देखील तिने काम केलं आहे. नेटफ्लिक्सच्या काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजिब दास्तान या वेबसिरीज मध्ये देखील तिने काम केलं आहे.
मात्र तिची खरी ओळख तिला सोनू के टिटू की स्विटी या सिनेमा मधूनच मिळाली. लव रंजन सोबत तिने अनेक सिनेमा केले आहेत. आणि आता येणार सिनेमा देखील लव रंजन सोबतच आहे. मात्र तिच्या प्रकृतीमुळे सध्या सिनेमाचे चित्रीकरण थांबले आहे. सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये नुसरत आहेच, त्यामुळे तिच्याशिवाय शूटिंग होऊच शकत नाही, असं मेकर्सने सांगितले आहे.