‘शाळा’ चित्रपटातील मुकुंद आठवतो का? दिसतोय एकदम हँडसम, बनलाय अत्यंत स्टायलिश… पहा फोटो..

टाईमपास, फॅन्ड्री, किल्ला, शाळा, एलिझाबेथ एकादशी हे मराठी प्रेक्षकांच्या त्या यादीमदधील सिनेमा आहेत, जे कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळी बघता येतात. जे सिनेमा बघताना कधीच कंटाळा येत नाही, आणि प्रत्येक वेळी सिनेमा बघताना मनोरंजनच होते असे हे अगदी छान सिनेमा आहेत.
या सिनेमांची खासियत म्हणजे हे सारे सिनेमा बालकलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिट बनवले. या सिनेमा मध्ये काही दिग्ग्ज कलाकार असले तरी प्रमुख पात्राच्या भूमिकेत, कोणी तरी बाल-कलाकारच आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने या सिनेमानं चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण करुन दिले.
त्यापैकीच एक सिनेमा आहे ‘शाळा’. केतकी माटेगावकर आणि अंशुमन जोशी या दोघांनी या सिनेमाला खूपच सुंदर, रोमँटिक सिनेमा बनवला होता. आजही या सिनेमामधील सर्वच पात्र चाहत्यांच्या मनात आहेत. त्यापैकी सर्वात म्हत्वाचे आणि प्रमुख पात्र होते अंशुमन म्हणजेच मुकुंद चे. सुजय डहाके यांच्या या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
शालेय आयुष्यात कोवळ्या बालकांच्या मनातील घालमेल पडद्यावर खूपच सुंदर पद्धतीने या सिनेमामधून दाखवण्यात आले होते. केवळ मराठीच नाही पूर्ण अंतरराष्ट्रीय पातळीवर, एक नवीन अध्याय या सिनेमाने रचला होता. सिनेमामध्ये अगदी साधारण दिसणाऱ्या मुकुंद ला तुम्ही आता पाहिलं आहे का? सिनेमामध्ये साधा दिसणारा मुकुंद आता, लय भारी दिसतो.
त्याच्या स्टाईल आणि भन्नाट लुकच्या खूप मुली चाहत्या आहेत. मुकुंद अर्थात अंशुमन आता मोठा झाला आहे आणि आता तो खूपच हँडसम दिसतो आहे. रफ दाढी आणि स्टाईल लूक मध्ये हा मुकुंदच आहे का,असा प्रश्न तुम्हाला पडेल. शाळा सिनेमानंतर केतकी माटेगावकर, टाईमपास आणि अनेक सिनेमामध्ये झळकली.
परंतु, अंशुमन याने काही मोजकेच सिनेमा केले. म्हैस, फुंतरु, फास्टर फेणे, या सिनेमामध्ये अंशुमन ने काम केले आहे. त्याचबरोबर बॉलीवूडच्या दिग्ग्ज अभिनेता इरफान खान, साऊथचा सुपरस्टार सलमान दळकीर आणि मिथिला पालकर यांच्यासोबत कारवाँ या हिंदी सिनेमा मध्ये देखील त्याने काम केलं आहे.
त्याचसोबत फोटोकॉपी या सिनेमामध्ये देखील तो झळकला होता. त्याचबरोबर त्याने काही मराठी नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. दिग्दर्शक, लेखक,चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार अश्या वेगवेगळ्या भूमिका हा अभिनेता आता साकारतो आहे. या अभिनेत्याला फोटोग्राफीचे तुफान वेड आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर, त्याने स्वतः कैद केलेले अनेक सुंदर असे क्षण, मनमोहक फोटोज तो शेअर करत असतो.
त्याच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतो. मनोज वाजपेयी त्याचा आवडीचा कलाकार आहे. मनोज वाजपेयी सोबत त्याने आपला फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तो लिहतो ‘घामाघूम होऊन दमछाक झाली. ह्या दिग्गजासमोर ती होणं साहजिक आहे.’आपल्या आवडत्या अभिनेत्यासमोर त्याची चांगलीच दमछाक झालेली यामध्ये दिसली. सध्या काही नाटकांच्या प्रयोगामध्ये तो काम करत आहे. मात्र लवकरच त्याला पुन्हा, सिनेमा मध्ये बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.