शनाया म्हणजेच रसिका सुनील अ’डकणार लग्नबेडीत, सातासमुद्रपार ‘या’ व्यक्तीसोबत करणर लग्न…

मनोरंजन
प्रत्येकासाठी प्रेमाची परिभाषा वेगळी असते. लहानपणापासूनच, अनेक मुली आपला राजकुमार कसा असेल, याबद्दलची स्वप्न रंगवत असतात. आपल्याकडे, जवळपास प्रत्येक गोष्टीमध्ये,एका राजकुमारीसाठी एक राजकुमार येतो. तो तिला दूरदेशी घेऊन जातो, आणि कथा संपते. त्यामुळे, अनेक मुली त्या स्वप्नांच्या आणि कथांच्या विश्वात रमतात.
यामध्ये, केवळ सर्व साधारणच नाही तरी, सर्वच मुली रमत असल्याच आपल्याला बघायला मिळत. मात्र असं असलं तरीही, केवळ काहीच मुलींचे स्वप्न पूर्ण होतात आणि त्यांना हवा तसा जोडीदार मिळतो. सात- समुद्रपार करून, कोणी राजकुमार येणं, हे केवळ स्वप्नच वाटतं. मात्र जर कोणाच्या बाबतीत हे खरं झालं तर, त्याहून जास्त सुख ते कोणतं.
असच काही झालं आहे, मराठमोळी अभिनेत्री रसिकाच्या बाबतीत. झी मराठीवरील, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधून शानायच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेली रसिका सर्वाना ठाऊकच आहे. तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. काही जाहिरातींमध्ये देखील ती झळकली होती.
मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, आणि शानयाच्या पात्राला भरगोस प्रसिद्धी मिळत असताना, रसिकाने अचानक ती मालिका सोडणायचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे अनेकाना ध’क्का बसला होता, तर काही चाहते तिच्यावर नाराज देखील झाले होते, मात्र, तिने घेतलेल्या त्या निर्णयामुळे, तिला आज तिच्या साता-जन्माचा जोडीदार मिळाला आहे.
मालिका सोडून ती पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी, लॉस-एंजेलिसला गेली होती. आणि तिथेच तिची ओळख, आदित्य बिलागीसोबत झाली. त्यांची झालेली ती ओळख प्रेमात रूपांतरित झाली, आणि नवीन नात्याची सुरुवात झाली. रसिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियाचा अकाउंट वरुन, त्यादोघांचा एक फोटो शेअर करत त्याबद्दलची माहिती दिली होती.
त्यांच्या, त्या फोटोवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव झाला होता. आदित्य आणि रसिक दोघेही, सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. अनेकवेळा ते दोघे एकमेकांचे फोटोज देखील शेअर करत असतात. आता याच जोडप्याने अजून एक खुशखबर आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. लवकरच आता रसिका आणि आदित्य लग्न करणार असल्याचं त्यातून समजत आहे.
या फोटोमध्ये रसिका आणि आदित्य दोघे सोबत बसलेले असून, रसिकाच्या मांडीवर तिचा लाडका रश एक पाटी घेऊन बसलेला आहे. ‘माय ह्युमन फ्रेंड्स आर गेटिंग मॅरीड’ म्हणजेच माझे हे दोघे मित्र लवकरच लग्न करणार आहेत, असं त्यावर लिहलं आहे. या पोस्टवर टाकलेलं कॅप्शन सर्वात जास्त लक्षवेधणारे ठरलं. यामध्ये रसिकाने, रश आणि आदित्यच्या पहिल्या भेटीचा किस्सा लिहला आहे.
ज्यामध्ये रश म्हणतो की,’माझ्या वयात पहिल्याच नजरेत समजत, मुलगा आणि मुलींमध्ये काय सुरु आहे?’ रसिक प्रचंड फिल्मी आहे, म्हणून तिने पोस्टदेखील चांगलीच फिल्मी टाकली आहे. आदित्य आणि रसिकाने सोबतच हा फोटो शेअर आपल्या लग्नाची बातमी दिली आहे. या गोड बातमीमुळे, त्यांचे चाहते चांगलेच खुश झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेक कलाकारांनी देखील त्यादोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.