विनोद वीर ‘अरुण कदम’ यांच्या पत्नीचे फोटो पाहिले का ? पहा अभिनेत्री पेक्षाही दिसतात सुंदर..

सध्या छोट्या पडद्यावर कॉमेडी शोचा खूप मोठ्या प्रमाणात बोलबाला सुरू असल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी हे कॉमेडी शो सुरू झालेले आहेत. मराठी वाहिन्यांवर काही वर्षांपूर्वी केवळ सह्याद्री ही वाहिनी होती. मात्र, कालांतराने प्रादेशिक वाहिन्यांमध्ये झी समूहाने एन्ट्री केली. त्यानंतर झी मराठी वाहिनी देखील सुरु झाली.
याचे नाव सुरुवातीला अल्फा मराठी होते. त्यानंतर झी मराठी हे नाव ठेवण्यात आले. आता या मराठी वाहिन्यांमुळे अनेक कलाकारांना चांगला वाव मिळत आहे. तसेच त्यांना कलागुणांना दाखवण्याची संधी देखील मिळत आहे. आता मराठी वाहिन्यांमध्ये जवळपास डझनभर वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या वाहिन्यांवर वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा सुरू असतात.
तसेच या वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिका देखील दाखवण्यात येत असतात. काही वर्षांपूर्वी हिंदी मध्ये “कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा” हा शो सुरू झाला होता. या शो ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मराठी मध्ये देखील असे अनेक शो यशस्वी झाले. सध्या मराठी मध्ये “महाराष्ट्राची हास्य जत्रा”,” चला हवा येऊ द्या” यासारखे शो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
त्यामध्ये भाऊ कदम, सागर कारंडे, डॉक्टर निलेश साबळे, श्रेया बुगडे यासारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असतात, तर इतर वाहिन्यांवर देखील असेच शो सुरू आहेत. अशाच एका शोमध्ये काम करणाऱ्या कलाकाराबद्दल आम्ही आपल्याला आज माहिती सांगणार आहोत. “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या शोमध्ये अरुण कदम हे कलाकार दिसतात.
अरुण कदम आपल्या अफलातून टायमिंग मुळे प्रेक्षकांच्या चांगलेच मनोरंजन करतात. अरुण कदम यांची आगरी भाषेवर प्रचंड पकड आहे. आगरी भाषेवर पकड असल्यामुळे ते आगरी भाषेतच विनोद करताना देखील दिसतात. अरुण कदम हे मराठीतील दिग्गज असे कलाकार आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक या मध्ये काम केलेले आहे.
त्यांनी अनेक मराठीतील दिग्गज कलाकारांसोबत देखील काम केलेले आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासारख्या कलाकारांसोबत त्यांनी विनोदी भूमिका साकारलेल्या आहेत. अरुण कदम यांनी आजवर ओवाळते भाऊ राया, घंटा जलसा, शिन्मा, जस्ट गंमत, सासुबाई गेल्या चोरीला, टाटा बिर्ला आणि लैला या आणि इतर चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
विशेष म्हणजे अनेकांना माहीत नाही की, अरुण कदम यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. होय, 2009 मध्ये आलेल्या “बायपास” या हिंदी चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्याचबरोबर 2011 मध्ये “दिल तो बच्चा है जी” या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
सनि देवल याच्या “काफिला” या चित्रपटातही ते दिसले होते. अरुण कदम यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम असे आहे. त्यादेखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अरुण कदम आणि वैशाली कदम हे सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो अपलोड करत असतात. त्यांच्या फोटोला खूप मोठ्या प्रमाणात लाईक देखील मिळत असतात.
वैशाली कदम या दिसायला अतिशय सुंदर अशा आहेत. अरुण कदम यांच्या मुलीचे नाव सुकन्या कदम असे आहे. काही दिवसापूर्वी सुकन्या हिचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याला मराठीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अरुण कदम यांचे जावई एका बिअर कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत असल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला आवडतात का? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये. नक्की सांगा.