‘वाहिनीसाहेबां’चं छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेत पुन्हा एकदा साकारणार तशीच रुबाबदार भूमिका !

मनोरंजन
कलाविश्व एक सुंदर जग आहे. काहींना याचा वा’ईट अनुभव आलाच असेल, मात्र काहींना त्याचा चांगला अनुभव देखील येतो. ज्यांना, याचा चांगला अनुभव येतो, त्यांना कलाविश्व सोडून जावं वाटत नाही. साहजिकच त्यासाठी तुमची लोकप्रियता आणि कौशल्य असणे आवश्यक असते. आधीच्या तुलनेत आता छोटा पडदा देखील चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.
छोट्या पडद्यावरील कलाकरांना देखील भरगोस प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत आहे. खास करून, मालिकेमधील कलाकारांना. प्रत्येक महिन्याला एक तरी मालिका, प्रेक्षकांच्या भेटीला येतेच. मात्र, प्रत्येक मालिकेला यश मिळतच असे नाही. तर काही मालिका, कितीही जुन्या झाल्या तरीही, रसिकांच्या मनातून जात नाहीत.
या सुखांनो या, चार दिवस सासूचे, आभाळमाया, यासारख्या मालिकांचा आजही एक वेगळा असा चाहतावर्ग आहे. यासारख्या खूप कमी मालिका आहेत, ज्यांची लोकप्रियता तुफान होती. ‘तुझ्यात जीव रंगला’, ही देखील अशाच खास मालिकांपैकी एक होती. झी मराठीवरील, तुझ्यात जीव रंगला या मालिकेला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते.
राणा दा आणि पाठक बाईंच्या प्रेमकथेने, संपूर्ण महाराष्ट्राला जणू वेडच लावले होते. या मालिकेतील कलाकरांना देखील भरगोस प्रसिद्धी मिळाली. नंदिता सूरजसिंग गायकवाड अर्थात वाहिनीबाईंची भूमिका साकारणारी धनश्री काडगावकरची लोकप्रियता देखील या मालिकेतून प्रचंड वाढली होती. त्याआधी देखील काही मालिकांमध्ये आणि मराठी सिनेमामध्ये धनश्री झळकली होती, मात्र वाहिनीसाहेब म्हणून तिला तुझ्यात जीव रंगला यमालिकेतून ओळख मिळाली.
ब्रेव्हहार्ट, चिट्ठी, गोआ ३५०किमी यासारख्या सिनेमामध्ये देखील ती झळकली होती. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, अचानकच धनश्री गायब झाली. तिने काही काळ, अभियानापासून अंतर केले होते. मात्र आयुष्यातील सर्वात मोठ्या सुखाचा अनुभव ती याकाळात घेत होती. धनश्री आई झाली. म्हणून, काही काळापासून ती कुठेच दिसत नव्हती.
मात्र आता धनश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, पुनरागमन करत आहे. यंदाच्या वेळी तिची भूमिका काहीशी वेगळी आणि खास असणार आहे. म्हणून तिचे चाहते देखील चांगलेच उत्सुक आहेत. नवरात्री विशेष, ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतून ती पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. यामध्ये ती एका देवीची भूमिका साकारत आहे.
त्याचे काही फोटोज देखील तिने स्वतः आपल्या सोशल मीडियाचा अकाउंट वरुन शेअर केले आहेत. आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणते की,’माझ्या मुलाच्या जन्मानंतर, खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. यामुळे मध्ये मोठा गॅप आला. म्हणून, मला पुन्हा काम करता येईल कि नाही, मी काही विसरली तर नाही ना, अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या.
पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून ही भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’ दरम्यान तिच्या या फोटोवर तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत असल्याचं बघायला मिळत आहे.