वर्षा उसगावकर, स्मिता पाटील आहेत ‘या’ दिग्गज राजकारण्यांच्या मुली .. जाणून घ्या राजकीय नेत्यांच्या मुलांचे मराठी कनेक्शन…

वर्षा उसगावकर, स्मिता पाटील आहेत ‘या’ दिग्गज राजकारण्यांच्या मुली .. जाणून घ्या राजकीय नेत्यांच्या मुलांचे मराठी कनेक्शन…

राजकारण आणि बॉलिवुड हे तसे परस्परविरोधी क्षेत्र असले तरी या दोन्ही क्षेत्राचा एकमेकाशी अतिशय जवळून संबंध येतो. राजकारणामध्ये असलेले अनेक जण बॉलिवूडमध्ये देखील कार्यरत असतात. म्हणजेच त्यांचे मुले किंवा नातेवाईक हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असतात.

अनेक राजकारणी व्यवसायाचा भाग म्हणून देखील बॉलीवुडकडे पाहत असल्याचे आपण आजवर पाहिले असेल. माजी खासदार सूर्यकांता पाटील यांची कन्या ही बॉलिवूडमध्ये कार्यरत होती. आम्ही आपल्याला अशाच राजकारणी घराण्यात जन्मलेल्या मुलांचे बॉलीवूड कनेक्शन सांगणार आहोत.

१.रितेश देशमुख: रितेश देशमुख याने तुझे मेरी कसम या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात जेनेलिया डिसुझा दिसली होती. रितेश देशमुख याचे वडील म्हणजे दिवंगत विलासराव देशमुख हे सर्वत्र देशाला परिचित आहेत.

काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता रितेशचे भाऊ अमित देशमुख व धीरज देशमुख देखील राजकारणात सक्रिय आहेत. तर रितेशने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे.

२. वर्षा उसगावकर : साधारणत वीस वर्षांपूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वर्षा उसगावकर यांनी चांगलेच नाव कमावले होते. आजही छोट्या पडद्यावर त्या कार्यरत असल्याचे दिसते. वर्षा उसगावकर या गोवा विधानसभेचे माजी उपसभापती अच्युत उसगावकर यांची कन्या होय. ते दिग्गज राजकारणी होत.

३.स्मिता पाटील : मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने रुपेरी पडदा गाजवून सोडला होता. काही वर्षांपूर्वी स्मिता पाटील यांचे निधन झाले होते. स्मिता पाटील या शिवाजीराव पाटील यांच्या कन्या होत. शिवाजीराव पाटील हे आमदार होते. तसेच स्मिता पाटील यांची आई विद्याताई पाटील यादेखील समाजसुधारक होत्या.

४. संस्कृती बालगुडे : मराठी चित्रपटसृष्टीतील हा नवा दमदार चेहरा असून तिने अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे. संस्कृती ही काँग्रेस नेते व प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांची कन्या होय.

५. सत्या मांजरेकर: सत्या मांजरेकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा होय. महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक चित्रपटातून काम केले आहे. तसेच त्यांनी अतिशय हिट असे चित्रपट हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.

2014 मध्ये मनसेकडून महेश मांजरेकर हे लोकसभेला उभे राहिले होते. त्यामुळेच राजकारणाशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे मैत्रीचे नाते आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *