वरून धवन नंतर यावर्षी, सलमानसह ‘हे’ बॉलिवूड कलाकार चढणार बोहल्यावर, ‘हा’ कलाकार करणार तिसरं लग्न…

वरून धवन नंतर यावर्षी, सलमानसह ‘हे’ बॉलिवूड कलाकार चढणार बोहल्यावर, ‘हा’ कलाकार करणार तिसरं लग्न…

आपल्याला माहित आहे कि कोरोनामुळे सिनेमा हॉलमध्ये अनेक चित्रपट रिलीज होत नाही आहेत शिवाय अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील यामुळे स्थगित करण्यात आले आहे. पण असे असूनही अनेक बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात सतत काहीतरी नवनवीन गोष्टी घडत आहेत.

जिथे 2020 मध्ये बॉलिवूडचे अनेक दिगज्ज कलाकार आपल्याला सोडून गेले पण त्याचवेळी, 2021 मध्ये बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात खूप आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर्षी अनेक कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. नुकतेच वरुण धवनने आपल्या मैत्रिणीशी म्हणजेच नताशा दलालशी लग्न केले आहे.

पण यानंतर देखील अनेक कलाकार आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. आज आपण अशा बॉलीवूड कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे लवकरच लग्न होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कि हे कलाकार कोण आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट:- रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. दोघेही बर्‍याच वेळा आपल्याला एकत्र फिरताना दिसले आहेत. त्याचबरोबर या दोघांच्या लग्नाबद्दल देखील अनेक अ’फवा पसरल्या होत्या. पण आता असे म्हटले जात आहे की या वर्षी लवकरच हे दोघे लग्न करतील. एवढेच नव्हे तर नववर्षाचे स्वागत देखील या दोघांनी मिळून धुमधडाक्यात साजरे केले होते.

मलायका आणि अर्जुन कपूर :- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे सुरुवातीला एकमेकांना बर्‍यापैकी गुप्तपणे भेटायचे, अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचं नातं मीडियापासून लपवलं होतं.

पण आता दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. सोशल मीडियावर परस्परासोबतचे फोटो शेअर करतात आणि त्यावर कमेंटही करतात. पण आता बातम्या येत आहेत की अर्जुन आणि मलायका या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत, तसेच या बातमीला खुद्द अर्जुन कपूरने देखील दुजोरा दिला आहे.

अली फजल आणि रिचा चड्डा:- मिर्झापूर फेम अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्डा यावर्षी लग्नाची बातमी देऊ शकतात. हे दोन्ही सेलिब्रेटी 2020 मध्ये लग्न करणार होते पण को’रो’ना वि’षाणूच्या सा’थीमुळे होऊ शकले नाही. आता बातमी येत आहे की लवकरच या दोघांचेही लग्न होणार आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ:- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपले वैयक्तिक आयुष्य अगदी खासगी ठेवले आहे, पण आता श्रद्धा कपूर यावर्षी तिचा प्रियकर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठशी लग्न करणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला बॉलीवूडमध्ये आणखी एक ज’बरदस्त लग्न पाहायला मिळणार आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल:- सुष्मिता सेनसुद्धा बरीच प्रतीक्षा करून यावर्षी लग्न करणार आहे. सुष्मिता सेन ही रोहमन शॉल या तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार आहे. इतकेच नाही तर हे दोघेही अनेकदा आपले सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करतात. तसेच त्यांचे चाहते देखील बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

तारा सुतारिया आणि आद जैन:- तारा सुतारिया आणि अदार जैन त्यांच्या अ’फेअरला घेऊन नेहमी चर्चेत असतात. तारा आणि आदरला अनेकवेळा एकत्र स्पॉट झाले आहेत. तारा सुतारिया कपूर आणि जैन कुटुंबीयांच्या फार क्लोज आहे.

अनेकवेळा ती घरगुती कार्यक्रमांच्यावेळी आवर्जुन उपस्थि असते. आता तारा आणि आदर मालदीवला व्हॅकेशनसाठी एकत्र गेले असल्याची माहिती मिळतेय. पण आता ते लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे आणि तशी त्याच्या कुटुंबाची देखील इच्छा आहे.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर:- बॉलिवूडमधील प्रेम प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरहान आणि शिबानी ही जोडी देखील चर्चेचा विषय ठरली होती. फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून वि’भक्त झाला होता.

मात्र, फरहानने यावर सार्वजनिक आयुष्यात भाष्य करणं नेहमी टाळलं आहे. पण आता बॉलीवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सलमान खान आणि यूलिया व्हंतूर:- सलमानचे त्याची रोमानियन मैत्रीण यूलिया वंतूर हिच्यासोबत असलेल्या मैत्रीबाबत सर्वांनाच कल्पना आहे. पण आजकाल ही मैत्री जरा जास्तच घट्ट झाली आहे. सलमान आपल्या या खास मैत्रिणीबरोबर एकदम छान वेळ घालवत आहे.

हे दोघेही गोव्यात नवीन वर्ष साजरे करताना दिसले. च्यातील या जुगलबंदीमुळे दोघात असलेले नाते मैत्रीपेक्षाही काही वेगळेच असल्याचे यावरून स्पष्ट होते आणि असे म्हंटले जात आहे कि सलमान खान यावर्षी यूलिया सोबत आपली लग्न गाठ बांधू शकतो.!

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *