वयाच्या १४ व्या वर्षी २१ वर्षाची दिसते ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, पतीपासून दूर एकटीच करतेय मुलीचा सांभाळ…

वयाच्या १४ व्या वर्षी २१ वर्षाची दिसते ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, पतीपासून दूर एकटीच करतेय मुलीचा सांभाळ…

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा केली ती सैफ आणि करीनाच्या तैमूरने. खूप कमी वयातच त्याचे लाखो फॅन झाले आहेत. त्याच्या जन्मापासूनच तो नेहमी चर्चेत असतो. त्याच्या इतकी वाहवाह कदाचित कोणत्या स्टारच्या वाट्याला आई असेल. पण सध्या ही क्रेज सोशल मीडियावर दिसायला मिळते.

प्रत्येक जण आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून वाहवाह मिळवण्याचा पर्यंत करत असतो. पण त्यात सगळेच यशस्वी होत नाही. नुकतेच अनिता हंसनदानीच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, आता परदेस गर्ल महिमा चौधरीची मुलगीही चर्चेत आली आहे. एरव्ही कधीच लाईमलाईटमध्ये नसलेली महिमाची मुलगी नुकतेच आई महिमासोबत स्पॉट झाली होती. पहिल्यांदाच आई आणि मुलगीची झलक मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होताच नेटीझन्सच्याही नजरा त्यांच्याच फोटोवर खिळल्या होत्या. महिमा चौधरीच्या मुलीचे नाव अरियाना चौधरी असे आहे.

अरियाना फक्त १४ वर्षांची आहे. तिचा क्युटनेस बघून नेटीझन्सही तिच्या फोटोंवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे. अरियानाला पाहून इतर स्टारकिडसचा विसर नेटीझन्सना पडला आहे. कारण सोशल मीडियावर अरियानाच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

अरियाना ही महिमा चौधरी आणि बॉबी मुखर्जी यांची मुलगी आहे. वर्ष 2006 मध्ये महिमाने बिझनेसमॅन बॉबी मुखर्जीशी लग्न केले होते. 2013 साली काही कारणामुळे दोघेही वेगळे झाले. महिमा आणि बॉबी मुखर्जी यांनी आजपर्यत घटस्फोट घेतला नसला तरी वेगळे राहतात.

वेगळेझाल्यानंतर मुलीच्या कस्टडीसाठी दोघांनी कोर्टाच्या कित्येक वर्ष फे-या कराव्या लागल्या होत्या. अखेर मुलीची कस्टडी आई महिमा चौधरीलाच देण्यात आली होती. तेव्हापासू महिमा एकटीनेच मुलगी अरियानाचा सांभाळ करत आहे.

महिमा चौधरीने 1997 मध्ये ‘परदेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाद्वारे महिमा चौधरीची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. परदेसमध्ये महिमा चौधरीने गावातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय महिमाने ‘दिल क्या करे’, ‘लज्जा’, ‘धडकन’, ‘दिवाना’, ‘दिल है तुम्हारा’, ‘ओम जय जगदीश’ असे अनेक चित्रपट केले आहेत. महिमा शेवटची २०१६ मध्ये बंगाली क्राइम थ्रिलर ‘डार्क चॉकलेट’ मध्ये दिसली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *