व’याच्या विशीतच ‘या’ मराठी अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर खरीदी केली आलिशान म’हागडी कार! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री जाणून घ्या….

आपल्याला माहित आहे कि वयाच्या विशीत आपण आपल्या करियरवर लक्ष देत असतो, हे वय खरं तर आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो आणि या वयातच आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे काय करायचे आहे हे ठरवावे लागत असते.
आपण कुठल्या कॉलेजला जाणार आहोत आपण काय शिक्षण घेणार आहोत यावर आपण आपले लक्ष केंद्रित करून आपले भविष्य कसे उज्ज्वल आणि आनंदी असेल याकडे साधारण आपण लक्ष देत असतो, पण आपल्याला माहित असेल कि आपल्या स’माजात असे अनेक मु’ले मु’ली आहेत ज्यांनी आपल्या वयाच्या विशीतच यशाचे सर्वोच शिखर गाठले आहे.
आता याला अभिनेत्री गौरी कुलकर्णी देखील काही अपवा’द नाही. कारण ती आपल्या वयाच्या विशीतच एक नवीन कार घेत आहे. होय, आपल्यामधील कित्येक लोक वयाच्या चाळीशीमध्ये सुद्धा कार घेण्याचे स्वप्न पाहत असतात, पण ही नवोदित अभिनेत्री चक्क आपल्या वयाच्या विशीत कार घ्यायला पोहचली आहे.
गौरी 2021 मध्ये आपली सर्व स्वप्नं पूर्ण करताना दिसत आहे. तिच्या चर्चेत येण्याचं कारणही तसं खास आहे म्हणा. गौरीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये गौरी आपल्याला तिच्या नवीन महागड्या आणि आलिशान कार सोबत पोज देताना दिसत आहे. गौरीनं नुकतीच नवी गाडी घेतली आहे, तर गौरी अवघ्या 20 वर्षांची आहे. अवघ्या 20 व्या वर्षीच एखादी मराठी अभिनेत्री कार घेते आहे याचं अनेक चाहत्यांना मात्र खूप कौतुक वाटत आहे.
फोटो शेअर करताना गौरीनं खास कॅप्शही दिलं आहे. तिच्या चेहऱ्यावर तिचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सध्या गौरीचा आनंद गगनात मावेनासा झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिचे आई बाबा सुद्धा खूप खुश आहेत आणि त्यांनी आपल्याला अशी मुलगी लाभली हे आमचे भाग्य आहे असे म्हणत आहेत.
तर इकडे गौरीनं कारचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांसह सहकलाकारांनीही यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचं तोंडभरून कौतुक देखील केलं आहे. गौरीच्या खा’सगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती मूळची अहमदनगरची आहे.
तिथंच तिचं 12 वी पर्यंतचं शिक्षण झालं. तिनं पदवीचं शिक्षण घेतलं असून कथ्थक नृत्यात ती पारंगत आहे. कॉलेज स्तरावरील स्पर्धांमध्ये तिंन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. गौरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2017 साली आलेल्या रंजन सिनेमातून तिनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.
गा’वातील प्रे’मक’थेवर आधारीत हा सिनेमा होता. सध्या ती युवा वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत सई आणि नचिकेत यांची प्रे’मकहा’णी दाखवण्यात आली असली, तरीही या प्रे’मकहा’णीला ‘मराठी भाषेचा आणि मराठीवरील प्रेमाचा’ एक सुंदर साज आहे.
पारंपरिक महाराष्ट्रीयन कुटुंबातील मुलीची भूमिका साकारणारी गौरी, स्वतः फार उत्तम मराठी बोलते. तिचा वाचनाचा छंद हे तिच्या शुद्ध आणि उत्कृष्ट भाषेचे मुख्य कारण आहे. या छंदाविषयी ती सर्वांना आवर्जून सांगते. शिवाय तिच्या चाहत्यांना सुद्धा ती वाचन करण्याचे आवाहन करते. मालिकेच्या सेटवर असतांना, नेहमीच एखादे तरी पुस्तक गौरी आपल्याजवळ बाळगते.