लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून अचानकच ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, कारण देताना म्हणाला…

लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून अचानकच ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, कारण देताना म्हणाला…

मनोरंजन

मराठी मालिकाविश्व आज खूप मोठं झालं आहे. अनेक मराठी मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, आज मराठी मालिकाविश्वाला या शिखरावर आणले आहे. दर दोन-तीन महिन्यातून एकदा, एखादी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेच. त्यामध्ये काही अत्यंत लोकप्रिय ठरतात, तर काहीना हवं तस यश मिळत नाही. मात्र काही मालिका असतात, ज्यांची चर्चा सुरुवातीपासून ऐकायला मिळते.

माझी तुझी रेशीमगाठ ही देखील अशाच काही मोजक्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या नावाची घोषणा झाली तेव्हापासून, त्या मालिकेने जोरदार चर्चा रंगवली होती. बॉलीवूडमध्ये देखील आपली वेगळी छाप सोडणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि हिंदी मालिका व मराठी सिनेमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रार्थना बेहरे या दोघांची जोडी बघायला चाहते आतुर होते.

त्यात मालिकेचा प्रोमो आला, आणि त्यामध्ये छोट्या चिमुकलीला बघून तर प्रेक्षक मोठ्या उत्साहाने मालिकेची वाट बघत होते. या मालीकेच्या पहिल्याच भागापासून, मालिकेचा टीआरपी उच्चंकावर आहे. त्यामुळे अल्पावधीकतच या मालिकेने आपला वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेच्या सर्वच पात्रांना, प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे.

खास करून चिमुकल्या परीने रसिकांची मने जिंकली आहेत. अगदी छोट्या काळात, परी म्हणजेच मायरा वैकुलने प्रेक्षकांना आपल्या निरागस अशा हास्याने आणि दमदार अभिनयाने स्वतःचा फॅन बनवले आहे. परीचे हास्य बघून सर्वच काही विसरायला होतं,अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी दिली आहे. याच मालिकेतील अजून एका पात्राच्या स्मितहास्याने अनेकांना मोहात पाडले आहे.

समीर म्हणजेच संकर्षण कऱ्हाडेच्या पात्राला अनेकांनी आपली पसंती दाखवली. मात्र आता या मालिकेच्या चात्यांसाठी एक दुःख’द बातमी आहे. समीर अर्थात संकर्षण कऱ्हाडे आता या मालिकेत दिसणार नाहीये. वेडींगचा सिनेमा, नागपूर अधिवेशन, खोपा यांसारख्या मराठी सिनेमामध्ये संकर्षणने काम केले आहे. त्याचबरोबर, देवाशपथ आणि खुलता कळी खुलेना या मराठी मालिकांमध्येही ती झळकला होता.

संकर्षणला नाटकांमध्ये काम करायला जास्त आवडते. आणि म्हणूनच तो आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमध्ये काही काळासाठी तरी दिसणार नाहीये. नुकतेच महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आता नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांना नाट्यगृहात, चित्रपट गृहामध्ये पाहायला मिळणार आहे.

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रसिकांमध्ये याबद्दलची उत्सुकता बघायला मिळत आहे. संकर्षण कऱ्हाडे यांचं ‘तू म्हणशील तसं…’ हे नाटक आता लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. निर्बंध उउठवण्यात आल्यामुळे २३ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे; तर २४ऑक्टोबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

म्हणूनच संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या नाटकाच्या दौऱ्यात चांगलाच व्यस्त असणार आहे. याचमुळे तो माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत काही काळासाठी तरी शूटिंगसाठी येऊ शकणार नाही. याबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला,’श्रेयससोबत काम करणे खरोखरच खूपच उत्तम असा अनुभव होता. मालिकेने मला वेगळी ओळख दिली आहे, म्हणून मला पुन्हा मालिकेत काम करायल नक्कीच आवडेल.

पण सध्या मी मालिकेतून ब्रेक घेत आहे. श्रेयस इतका मोठा अभिनेता असून देखील, सेटवर तो अगदी आमच्या सर्वांसोबत साधारण कलाकाराप्रमाणे मिक्स होतो. हि त्याची खासियत आहे.’ नाटकामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री भक्ती देसाई झळकणार आहे. त्यामुळे भक्ती देसाईने देखील सध्या काम करत असलेल्या सर्वच मालिकांमधून ब्रेक घेतला आहे. नाटकाचे निर्माते, प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *