‘लागीर झालं जी’ मधील शीतली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, या नव्या मालिकेतून करणार कम बँक..

‘लागीर झालं जी’ मधील शीतली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, या नव्या मालिकेतून करणार कम बँक..

साधारणतः एक ते दिड वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर लागिर झालं जी मालिका प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. यामध्ये शीतली आणि आज्या यांची प्रेम कहानी ही प्रचंड गाजली होती. यातील शीतली ही एवढी गाजली ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचली होती.

आजही शीतली हिला याच नावाने ओळखले जाते. तिचे खरे नाव शिवानी बावकर असे आहे. मात्र, तरी देखील ती जिथे जाते तिथे तिला शीतली असेच संबोधण्यात येते. शितली म्हणजे शिवानी बावकर ही अतिशय हुशार अशी अभिनेत्री आहे. तिने शिक्षणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. तिने काही वर्ष आयटी कंपनीत नोकरी देखील केली आहे.

एका आयटी कंपनीमध्ये ती जर्मन ट्रान्सलेटर म्हणून नोकरीला होती. त्यासाठी तिला लाखो रुपये मानधन देखील मिळत होते. कॉलेजमध्ये असताना तिने जर्मन ही भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती आणि या भाषेमध्ये तिला नंतर करिअर करण्याची संधी मिळाली. तिने नोकरी देखील केली.

मात्र, कालांतराने अभिनयाची आवड असल्याने ती मराठी मालिकांकडे वळाली आणि तिला लागिर झालं जी ही मालिका मिळाली. या मालिकेची चर्चा खूप झाली. त्यानंतर तिला इतर काही जाहिराती व मालिका ही मिळाल्या. मात्र, आता ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे काही महिन्यापूर्वी शिवानी बावकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

यामध्ये बेबी युवान याच्यासाठी 16 को’टी रुपयाचे इं’जेक्शन अमेरिकेहून मागवण्यात येत होते. बेबी युवान याच्या पालकाची परिस्थिती ही अतिशय खडतर होती. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी या मुलांसाठी मदत गोळा केली होती. शेवटी या मुलाला इं’जेक्शन देखील मिळाले. 16 को’टी रु’पयाचे इं’जेक्शन आणून ते बेबी युवान याला दिले.

मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर ही त्याचा मृ’त्यू झाला होता. त्यावेळेसही तिने आपली भावना व्यक्त केली होती. आता शिवानी बावकर ही लवकरच नवीन एका मालिकेत दिसणार आहे. ही मालिका सोनी मराठीवर सुरू होणार आहे. या मालिकेचे नाव ‘कुसुम’ असे दाखवण्यात आलेले आहे. आता मालिकेत तिचे नेमके नाव काय आहे, हे आत्ताच समजणार नाही.

मात्र, ही मालिका खूप चांगली असल्याचे दिसत आहे. सासर आणि माहेर यांना जोडणारा धागा अशी या मालिकेची थीम आहे. शिवानी बावकर हिने नुकताच याबाबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, सासर जोडायला माहेरची नाळ तोडण्याची गरज नाही. त्यामुळे या मालिकेची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. या मालिकेमध्ये लोकल ट्रेन मध्ये शिवानी बावकर आणि तिची मैत्रीण प्रवास करत असते.

त्यावेळेस तिची मैत्रीण तिला विचारते की, आज संध्याकाळी मिसळ पार्टी करायची का? त्यावेळेस शिवानी तिच्या मैत्रिणीला म्हणते की, आज संध्याकाळी मला माझ्या बाबांना दवाखान्यात दाखवायला जायचे आहे. त्यावर ती म्हणते की, अजूनही तेच करतेस का? त्यावर ती म्हणते की, सासर आणि माहेर जोडण्यासाठी सगळं काही आहे. ही मालिका देखील येणाऱ्या काही काळामध्ये धुमाकूळ घालणार असे दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *