‘लागिरं झालं जी’मधील शीतली आठवतेय का? २ वर्षात झालाय इतका बदल की दिसते Bold and Beautiful….

‘लागिरं झालं जी’मधील शीतली आठवतेय का? २ वर्षात झालाय इतका बदल की दिसते Bold and Beautiful….

मराठी, किंवा हिंदीच काय तर प्रदेशात देखील मालिकांचे प्रचंड चाहते आहेत. प्रत्येक भागात, चाहते आपल्या भाषेमध्ये मालिका बघणे सर्वजण पसंत करतात. आपल्या देशात देखील मालिकांचा भाला मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महिलाच नाही तर अनेक पुरुष मंडळी देखील हल्ली मालिका बघण्याचा आनंद लुटत आहेत.

अर्थातच मालिकेचे कथानक आणि मालिकेच्या कलाकारांचा अभिनय यामुळे, मालिका हिट किंवा फ्लॉप हे ठरते. काही मालिकांची लोकप्रियता तर प्रचंड असते. त्यामुळे त्यामधील कलाकारांना देखील कमालीची प्रसिद्धी मिळते. आणि मग तीच त्या कलाकारांची ओळख बनून जाते. पहिल्या मालिकेमधून मिळालेली ओळख नेहमीच खास असते.

मग ती हिंदी कलाकारासाठी असेल, किंवा मराठी कलाकारासाठी असेल. ती मालिका नेहमीच त्यांच्यासाठी खास असते. माघील काही वर्षांपूर्वी एका मालिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मराठी मालिका लगीर झालं जी, या मालिकेने तुफान लोकप्रियता कमावली होती. मालिकेचे नाव घेताच, शीतल आणि अजिंक्यची जोडी डोळ्यांसमोर उभी ठाकते.

एका सैन्यातील जवानासोबतच लग्न करायचे स्वप्न बघणारी शीतली आणि तिच्या प्रेमात वेडा झालेला अज्या या दोघांनी देखील चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेमध्ये त्यांची प्रेमकथा खूपच सुंदर प्रकारे दाखवण्यात आली होती, आणि सोबतच या मालिकेच्या कलाकारांनी देखील तेवढाच दमदार अभिनय केला. म्हणून ही मालिका आजही सर्वांच्या मनात आपली वेगळी जागा बनवून आहे.

या मालिकेत शीतलीची भूमिका शिवानी बावकर या अभिनेत्रीने रेखाटली होती. रेखाटली काय होती, ती या भूमिकेसोबत इतकी एकरुप झाली होती की, आजही तिला त्याच भूमिकेत बघण्याची तिच्या चाहत्यांना इच्छा आहे. मात्र मालिका संपली, त्यानंतर आपली वेगळी ओळख बनवावी यासाठी कलाकार नेहमीच धडपड करत असतात. तसेच शिवानी देखील करतच आहे.

तिने ‘युथ ट्यूब’ या मराठी सिनेमामध्ये देखील काम केले आहे. मात्र, साधी भोळी दिसणारी शीतली, आता कमालीची ग्लॅमरस झालेली बघायला मिळत आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहमीच आपले नवीन फोटोज आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतच असतात.

तिचा बदललेला हा बोल्ड अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत होती. आणि आता शिवणीने हलक्या आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोज शेअर केले आहेत. क्रॉप टॉप आणि स्कर्ट मध्ये ती कमालीचे बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

तिचा हा ग्लॅमरस अंदाज बघून तिचे चाहते तिच्यावर अजूनच फिदा झाले आहेत. अनेकांनी त्यावर वेगवेगळे कमेंट्स देखील केले आहेत. शीतली इतकी कशी बदलली असं म्हणत काहींनी विनोदी कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. लवकरच शिवानी एका म्युजिक अल्बममध्ये झळकणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *