लग्नाच्या एक महिन्यातच मानसी नाईकने तिच्या चाहत्यांना दिली गुड न्यूज, सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत म्हणाली…

मानसी नाईक नुकतीच तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अ’डकली आहे. यावेळी तिने तिच्या लग्नासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जोधा-अकबरमधील ब्राईडल लुक केला होता. मानसीने लग्नासाठी राणी रंगाचा लेहंगा घातला होता आणि हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने हेवी ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या या संपूर्ण लुकमध्ये ती ऐश्वर्या रायसारखीच सुंदर आणि नाजूक दिसत होती.
आता तिच्या लग्नाील अनेक फोटो व्हा’यरल झाले असून तिच्या लग्नात तिने खूपच धमाल केलेली दिसत आहे. पण आता लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी म्हणजेच फरीदाबादला गेली होती आणि आता ते दोघे सुद्धा मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसी आणि प्रदीप यांनी एकमेकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
आता नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती व्हिडीओतून त्या दोघांचा म्युझिक अल्बम भेटीला येत असल्याचे सांगितले आहे. मानसी नाईक हिने आपल्या सोशल मीडियावरून टीझर शेअर करत तिचा आणि प्रदीपचा नवीन म्युझिक अल्बम येत असल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, लग्न होऊनी महिना झाला ऋतू बहरला, वाटेवर मोगरा उमलला अन दरवळला, मनी मानसी डोळ्यांमध्ये भाव उतरले, प्रदीप झाले अवघे जगणे आणि उजळले.
मानसी नाईकच्या या व्हिडीओवर आता लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्या लग्नानंतर तिचे हा अल्बम लॉच करून तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमीच दिली आहे. या अल्बममध्ये हे नवे जोडपे आपल्याला एका नवीन रूपात दिसणार आहेत.
तसेच तिने याआधी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये ती फरीदाबादमध्ये शेतातील लिंबूच्या झाडावरून लिंबू तोडताना ती दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, ससुराल हो तो ऐसा..दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये…लव्ह यू इंडिया. ये भारत की बेटी है, दोनो मेरे अपने है..माझा महाराष्ट्र आणि खूप प्रेम माझ्या हरियाणाला.
तसेच जर आपण मानसीच्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाले तर प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे अनेक फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. तसेच त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
तर इकडे आपली लाडकी मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.
एकता – एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. पण आता मानसीचे अनेक चहाते लवकरच बाळाची सुद्धा अपेक्षा करत आहेत आणि लोकांनी अशी कमेंट देखील केली आहे कि लवकरच आम्हाला ही सुद्धा गुड न्यूज ऐकायला मिळो.