लग्नानंतर हनिमूनला जाऊन मिताली आणि सिद्धार्थ यांनी रोमँटिक फोटो केले शेयर, पहा बाथटब मधील तसला फोटो बघून हैराण व्हाल..

लग्नानंतर हनिमूनला जाऊन मिताली आणि सिद्धार्थ यांनी रोमँटिक फोटो केले शेयर, पहा बाथटब मधील तसला फोटो बघून हैराण व्हाल..

आपल्याला माहित आहे कि गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा सुरू होती, तो अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा नुकताच पुण्यात थाटामाटात पार पडला आहे. मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणून सिद्धार्थ आणि मिताली ओळख आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांना देखील खूप उत्सुकता होती.

अखेर हे नुकतेच दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाबसोहळ्यात सहभागी झाली होती.

तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते. मिताली व सिद्धार्थने लग्नात केलेली मस्ती, एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर एकमेकांना मारलेली घट्ट मिठी ते लेकीच्या लग्नात भावूक झालेली आई, तिच्या डोळ्यातील अश्रू असे सगळे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

पण आता सिद्धार्थ आणि मितालीच्या हनिमूनचे फोटो चांगलेच वायरल होत आहेत, पण आपल्याला ऐकून नवल वाटेल पण हे दोघे लग्नानंतर हनीमूनसाठी कोणतेही देशाबाहेरचे ठिकाण न निवडता चक्क ते लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्यातील मचान या रिसॉर्टवर हे दोघे थांबले होते.

टायनी पांडा ऑफिशिएल या इंस्टाग्राम पेजवर सिद्धार्थ आणि मितालीचे मचान येथील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. एका फोटोत तर मिताली मयेकर आपल्याला बाथटबमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

तेथील त्यांचे रोमॅण्टिक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. तर दुसऱ्या फोटोत सिद्धार्थ आणि मिताली किस करताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूपच भावतो आहे. त्यांच्या या फोटोंना त्यांच्या सहकलाकारांनी तसेच चाहत्यांनी भरपूर लाईक्स दिले आहेत.


तसेच आपणास सांगू इच्छितो कि मिताली आणि सिद्धार्थची ओळख ३-४ वर्षांपासूनची आहे. साधारण चार वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमावेळी त्यांची पहिली भेट झाली. मितालीचा त्या कार्यक्रमात एक पफॉर्मन्स होता, तर सिद्धार्थ त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता. त्यावेळची एक आठवण सांगताना मिताली म्हणाली, कोल्हापुरला त्या कार्यक्रमात माझा मित्र अभिनेता शिवराज वायचळने आमची ओळख करून दिली.

त्यानंतर रात्री तो कार्यक्रम संपल्यावर आम्ही एकत्र जेवायला बसले असताना माझे मित्र शुभंकर तावडे आणि प्रथमेश परब माझी मस्करी करत होते. सिद्धार्थही तिथं होता आणि वेळानं तोही त्यांच्यात सामील झाला. त्यानंतर तो फार छान वागायला लागला माझ्याशी.

तेव्हा मला वाटलं, की चांगला मुलगा आहे आणि तेव्हापासून आमचं बोलणं वाढत गेलं, आमची मैत्री वाढत गेली. त्यानंतर आमच्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे आमचं आम्हालाच कळलं नाही. अखेर या दोघांनी अगदी आनंदाने लग्न केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *