लग्नाच्या इतक्या वर्षानंतर बाळाची आई बनू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली पती दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने मी ‘या’ पद्धतीने…..

बॉलिवूड कलाकार जेवढे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असतात तेवढेच ते त्यांच्या लाइफस्टाइल आणि खासगी आयुष्यासाठीही असतात. त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी अनेकदा ऐकायला मिळत असतात. आता अशीच एक बातमी प्रियांका चोप्राबद्दल वायरल होत आहे.
आपल्याला माहित आहे कि प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
तसेच तिने स्वतःपेक्षा १० वर्षे लहान असलेल्या निक जोनससोबत लग्नगाठ बांधली होती त्यानंतर या लग्नाची खूप चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये रंगली होती. आता अशीच एक चर्चा रंगत आहे ती म्हणजे प्रियंकाच्या आई होण्याबद्दलची चला तर मग जाणून घेऊ कि प्रियंकाने फॅमिली प्लानिंग बद्दल काय म्हंटले आहे.
एका हाती आलेल्या माहितीनुसार प्रियंका आणि निक लवकरच आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. मात्र याआधी २०१९ मध्ये प्रियंका आणि निकच्या निकटवर्तीयाने असे सांगितले होते की या जोडप्यावर मुलाबाबत कोणताही दबाव नाही आणि ते दोघेही व्यावसायिकरित्या प्रतिबद्ध आहेत.
तसेच प्रियंका आणि निक हे आता वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत आणि ते आपल्या कामात फार व्यस्त आहेत. जेव्हा हे व्हायचे असेल तेव्हा होईल या धोरणाने हे जोडपे याबाबत निश्चिंत आहे आणि हा एक प्रकारचा त्याच्यासाठी आशीर्वादच आहे. मात्र आपल्या बाळाबाबत या जोडप्याच्या विचारांमध्ये गेल्या एक वर्षात बराच फरक पडलेला दिसत आहे.
पण प्रियंकाने नुकतेच असे म्हंटले होते कि मला देखील लवकरच आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्ही दोघे सुद्धा व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघे सुद्धा एकमेकांना टाईम देऊ शकत नाही. त्यामुळेच आमच्यात अजून पर्यंत असे काही झाले नाही पण येत्या काही दिवसांतच आम्ही आमच्या साठी वेळ काढून आम्ही आमच्या बाळाचा निर्णय घेणार आहोत असे प्रियंकाने सांगितले आहे.
तसेच तिने आपल्या बाळांसाठी काही प्लॅन देखील केला आहे तिची अशी इच्छा आहे कि तिच्या बाळाचा जन्म हा लॉस एंजल्समध्येच व्हावा, आणि ती देखील आपले दुसरे हनिमून साजरे करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे बोलले जात आहे.
तसेच निक जोनासने नुकतेच सांगितले होते की क्वारंटाईनमध्ये त्याची पत्नी प्रियंकाने कसा त्याच्यासोबत वेळ घालवला. तो म्हणाला होता, या सर्व गोष्टीत सर्वात मोठी उलथापालथ तेव्हा झाली जेव्हा आम्ही घरी होतो. जसे आमच्यासोबत एरवी घडत नसे ते सर्व या काळात झाले.
कारण गेल्या काही वर्षांपासून प्रोजेक्ट्समुळे आम्ही नेहमीच व्यस्त राहिलो आहोत. पण इथे सर्व उलट घडले, फक्त थोड्याच काळासाठी आम्हाला आमच्या मुळांशी जोडले जाण्याची संधी मिळाली त्यामुळे या दोघांना या मिळालेल्या वेळामुळे प्रियांका लवकरच आई बनेल अशी आशा सर्वांनाच आहे.
काय आहेत प्रियंकाचे कामाबाबतचे प्लॅन:- प्रियंका चोप्रा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या द व्हाईट टायगर या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत राजकुमार राव पडद्यावर असेल. नेटफ्लिक्सने या दोघांचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यामुळे चाहते उत्साहित आहेत आणि त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.