लग्नाआधीच ‘ही’ अभिनेत्री होणार आई, ‘हा’ फोटो काढणाऱ्याशीच करणार लग्न….

मनोरंजन
आजकाल, नात्यांनी वेगळं स्वरूप घेतलं आहे. अनेकांना, वेगवेगळी नाते आणि त्यातील गोडवा तर आवडतो, मात्र जबाबदारी नको असते. सुरुवातीच्या काळात, सर्वच बाबी अगदी पद्धतशीरपणे होत असे. पहिले मुलीचा बघण्याचा कार्यक्रम, मग साखरपुडा, मग लग्न आणि मग बाळ झालं की कुटुंब पूर्ण, असंच समजलं जात होत.
मात्र आता, प्रत्येक नात्याची परिभाषा बरीच बदलल्याचं बघायला मिळत आहे. अनेक मुली लग्नाच्याआधी आई होण्याचं सुख घेत आहेत. आणि त्याबद्दल त्यांना अभिमान देखील आहे. आता बऱ्यापैकी समाज देखील या सर्व गोष्टी स्वीकारत आहे. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या साखरपुड्याची बातमी अचानकच समोर आली. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात त्याची पार्टनर नताशा ग’रोदर असल्याचं त्याने स्वतः सगळ्यांना सांगितलं.
लग्नाच्या आधीच हार्दिक वडील बनला, मात्र त्यानंतर त्या दोघांनी लवकरच लग्न देखील केले. हार्दिक आणि नताशाला सर्व समाजाने मोठ्या प्रेमाने स्वीकारले. त्यांचे एकमेकांमधील प्रेम आणि विश्वास खूप चांगला आहे. कोणत्याही नात्यामध्ये तेच सर्वात महत्वाचं असत, हे त्यादोघानी जगाला दाखवून दिले. सोबतच सुपरस्टार रजनीकांतच्या, रोबोट २ सिनेमाची अभिनेत्री एमी जॅकसन देखील लग्नाच्या आधीच आई बनली.
तिच्या निर्णयाचे देखील सर्वानी स्वागतच केले. केवळ सेलेब्रिटीजच नाही तर आजकाल अनेक सिंगल मदर आपल्याला बघायला मिळत आहेत. यात सर्वात विशेष म्हणजे, आता समाज हे सर्व स्वीकारत त्या, महिलेच्या निर्णयाचे स्वागतच करत आहे. आता अजून एक सेलेब्रिटी अभिनेत्री, लग्नाच्या आधीच आई होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाची, नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही. संपूर्ण जगभरात या सिनेमाचा डंका वाजला होता. बाकी इतर मोठाल्या अवॉर्ड्स सोबतच, ऑस्कर अवॉर्ड देखील या सिनेमाने पटकावला होता. हॉलीवूडमध्ये बनलेल्या या सिनेमामध्ये, भारतीय कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने जगभरात नाव कमवले होते. या सिनेमामधील जवळपास सर्वच पात्र,चांगलेच लोकप्रिय ठरले.
या सिनेमामधील लतिकाने त्यावेळी सर्वांचीच मने जिंकली होती. अभिनेत्री फ्रिडा पिंटो, आपले अभिनय करियर बनवण्याच्या धडपडीत असताना तिला स्लमडॉग मिलेनियरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याआधी फ्रिडा साधारण जाहिराती करुन, आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आधीच बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींना, त्या रोल साठी विचारण्यात आले होते.
मात्र, जवळपास सर्वानीच ते पात्र नाकारले आणि फ्रीडाने मात्र त्यात अभिनय केला. साधारण जाहिरातीमध्ये काम करणारी फ्रिडा, रातोरात एक जागतिक स्टार बनली. त्यानंतर देखील तिने हॉलीवूडमध्येच काम करायला सुरुवात केली. याच सिनेमाच्या दरम्यान तिचे आणि देव पटेलचे अफेअर सुरु झाले. तब्ब्ल ६वर्ष त्यादोघानी एकमेकांनी डेट केले आणि त्यानंतर विभक्त झाले.
मात्र रोहन अंतोच्या रूपात तिला खरा जोडीदार मिळाला. रोहन अंतो एक फॅशन फोटोग्राफर आहे. त्याने अनेक मोठाले फॅशन इव्हेंट्सचे फोटोज काढले आहेत. रोहन आणि फ्रिडा माघील काही काळापासून एकमेकांच्या नात्यात आहेत. आत फ्रिडा ग’रोद’र असल्याचं तिने आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे.
आपल्या बेबी शॉवरचे फोटोज, तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला असून, त्यात ती खुप सुंदर दिसत आहे. आपल्या बाळाच्या आगमनाच्या पूर्वीच तिने, घर देखील रिनोएट केलं आहे. लवकरच फ्रिडा आणि रोहन लग्न करत असल्याच सांगितलं जात आहे.