लक्ष्मीकांत बेर्डेची मुलगी बनली उद्योजिका, पुण्यात सुरु केला हा नवीन बिजनेस…

लक्ष्मीकांत बेर्डेची मुलगी बनली उद्योजिका, पुण्यात सुरु केला हा नवीन बिजनेस…

मनोरंजन

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणलं की, अनेक वेगवेगळे पात्र आपल्या डोळ्यांसमोर उभे ठाकतात. मराठी सिनेसृष्टीमधील एक संपूर्ण काळ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गाजवला, असं म्हणलं तर ते खोटं ठरणार नाही. मराठी सिनेमध्ये काम करणारा लक्ष्मीकांत कधी, मराठी रासिकांच्या आवडीचा लक्ष्या बनला हे समजलंच नाही.

लक्ष्या आणि अशोक सराफ या दोघांच्या जोडीने अक्षरशः सगळीकडे धूम केली होती. चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर उचलून घेतले होते. अगदी सर्वसाधारण असा चेहरा, मात्र सोबतीला उमदा अभिनय आणि कोणतेही पात्र खुबीने रेखाटण्याची कला म्हणून लक्ष्या सर्वांच्या आवडीचा अभिनेता ठरला. आजही त्यांचे अनेक सिनेमा, चाहते मोठ्या आवडीने बघतात.

केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीमधे देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली वेगळी ओळख बनवली होती. त्यामुळे, आजही मोठ्या आदराने बॉलीवूड देखील अनेकवेळा लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढताना आपल्याला बघायला मिळते. आज लक्ष्मीकांत बेर्डे याना जाऊन, कित्येक वर्ष झाले आहेत.मात्र त्यांच्या कलेच्या रूपात ते आजही आपल्यामध्ये आहेत असच भासत.

अजून एका कारणामुळे ते आपल्यातच असल्याचं जाणव, ते म्हणजे त्यांचा मुलगा आणि मुलगी. ती सध्या काय करते आणि रॅम्पट सिनेमामधून रसिकांना अभिनय बेर्डेला बघण्याची संधी मिळाली. अभिनय एक उत्कृष्ट अभिनेता ठरत आहे, यात काही वाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे नाव, वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या अभिनय करत आहे.

तर दुसरीकडे त्याची बहीण म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी हिने देखील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिच्या या नाटकाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. शिवाय तिच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले होते. आता मात्र स्वानंदी उद्योगजगाकडे वळत असल्याचं बघायला मिळत आहे.

अभिनयामध्ये तिचा रस आहेच मात्र व्यवसाय करायला तिला जास्त आवडेल, असं तीच मत आहे. सध्या स्वानंदी जेमतेम २० वर्षांची आहे, मात्र तुम्हाला वाचून कौतुक वाटेल, स्वानंदीने आपले काम सुरु देखील केले आहे. एहाज क्रिएशन यानावाने स्वानंदीने आपला, स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे.

एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरिअल्स, दुपट्टा आणि ज्वेलरीच्या विविध प्रकारच्या व्हरायटी यासर्वांचा या ब्रँडमध्ये समावेश असणार आहे. सायली गवळी आणि स्वानंदी यादोघीनी मिळून हा एहाज क्रिएशन नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या आपल्या ब्रॅण्डच, प्रमोशन दोघीही अगदी जोरात करत आहेत.

इंस्टाग्राम, फेसबुक इ सोशल मीडियावर, आपल्या ब्रॅण्डच्या नावाने त्यांनी पेज देखील सुरु केले आहे. त्यामध्ये, त्याच्याकडे असणाऱ्या कलेक्शन, आणि काही खास कलेक्शनची झलक बघायला मिळत आहे. काही दिवसांनी, याच ब्रॅण्डच्या नावाखाली, पुण्यामध्ये त्यादोघीनी प्रदर्शन भरलं आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे असलेलं कलेक्शन तर बघताच येईल, मात्र आवडलेली वस्तू खरेदी देखील करता येईल. मराठी चित्रपटसृष्टीमधून अनेक कलाकार, स्वानंदीला तिच्या या व्यवसायासाठी शुभेच्छा देत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *