लक्ष्मीकांत बेर्डेंनी केली होती दोन लग्न, पहिली पत्नीदेखील होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

लक्ष्मीकांत बेर्डेंनी केली होती दोन लग्न, पहिली पत्नीदेखील होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

मनोरंजन

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव घेतले की आपल्यासमोर एक हजरजबाबी विनोद सादर करणारा अभिनेता उभा राहतो. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सचिन आणि अशोक सराफ यांच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात गाजली होती.

त्याचप्रमाणे दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासोबत देखील त्याने अनेक चित्रपटात काम केले होते. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा झपाटलेला हा चित्रपट एवढा चालला होता की या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील करण्यात आला होता. या चित्रपटाचा सिक्वल देखील काढण्यात आला होता. त्यावेळी प्रचंड हा चित्रपट चालला होता.

तात्या विंचू हेहे पात्र देखील खूप गाजले होते. सचिन सोबत त्याचा आलेला ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट गाजला होता. हा चित्रपट आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पहिला जातो. या चित्रपटातील सर्वच पात्र हे अतिशय सुंदर असे आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी इतर चित्रपटांत काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केले.

हिंदी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्यांना कधीही न्याय मिळाला नाही. मात्र, हिंदी चित्रपटात त्यांनी सह कलाकाराची भूमिका मोठ्या खुबीने साकारली. यात विशेष म्हणजे त्यांनी सलमान खान यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. सलमान खान याने सांगितले होते की, हम आपके है कोन आणि मैने प्यार किया या चित्रपटाचे यश हे खरे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आहे.

यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला होता की, ही माझ्या कामाची खरी पावती आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खान सोबत सुरुवातीला मैने प्यार किया हा चित्रपट केला होता. या चित्रपटातील त्यांचे पात्र हे सर्वांनाच आवडल होते. त्यानंतर त्यांनी हम आपके है कोन या चित्रपटात देखील भूमिका केली होती.

या चित्रपटात देखील त्याचे पात्र सर्वांनाच आवडले होते. सलमान खान चा तो जवळचा मित्र समजला जातो. याच प्रमाणे त्याने साजन या चित्रपटात देखील लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानच्या मित्राची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर मिळाल्या. पण त्यांना काही खास यश मिळत नव्हते. पण त्यांनी हिंमत सोडली नाही.

ते अनेक चित्रपट साईन करत होते. याच कालावधीत त्यांनी कमाल माझ्या बायकोची हा चित्रपट साईन केला. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रुही काम करत होत्या. कमाल माझ्या बायकोची चित्रपटाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती. या चित्रपटात अलका कुबल लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पत्नी होत्या. पण ते रुहीच्या प्रेमात पडले.

रुहीने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते.

या जोडीला दोन मुले देखील आहेत. आता प्रिया बेर्डे या अनेक मालिकांमधून दिसत असतात. अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे अशी दोघांची नावे आहेत. अभिनय बेर्डे याने नुकतेच मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची अचानक झालेली एक्झिट ही सर्वांनाच मनाला चटका लावून देणारी होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या अभिनयासाठी आजही ओळखले जाते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *