राहायला गोठा आणि पांघरायला आभाळ, मध्यरात्री ३ वाजता अंघोळ, आपल्या संघर्षामयी दिवसांचा ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा

चित्रपटसृष्टीमधे एखाद्या कलाकाराला यश मिळाल्यावर आपल्या सर्वाना त्यांची ओळख पटते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांचा जुन्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण नेहमीच उत्सुक असतात.
त्यांचे बालपण, शिक्षण, चित्रपटसृष्टीमध्ये कसे पदार्पण झाले आणि त्याआधी ते काय करत होते, असे एक ना अनेक प्रश्न पडतात. त्याचबरोबर हे सेलिब्रिटीज आता तर अगदी, श्रीमंत असे जीवन जगतात मात्र जेव्हा त्यांच्या स्ट्रगल सुरु होता किंवा त्याचं आधी ते कसं जगत होते याबद्दल देखील जाणून घेण्याची सर्वानाच इच्छा असते.
अनेक वेळा, हे कलाकारांची संघर्षगाथा खूपच हृदयद्रावक असते. मात्र असणाऱ्या सर्व बिकट परिस्थितींवर मात करून देखील त्यांनी जे मिळवली त्यातून अनेक स्ट्रग्लर्सला प्रेरणा मिळते. अशीच प्रेरणादायी संघर्षगाथा आहे आई कुठं काय करते मधल्या संजना म्हणजेच रुपाली भोसलेची.
बिग बॉस मराठी मधून, सगळीकडेच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणाऱ्या रुपाली भोसलेने मात्र अनेक संघर्षातून इथपर्यंतचा प्रवास केला आहे. यशाचे हे शिखर गाठत असताना तिला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होत. अशा समस्या ज्याबद्दल कधीच सर्वसामान्य लोकांनी विचार देखील केला नसेल.
सध्या आपल्या देखण्या रूपाने सर्वाना वेड लावणाऱ्या रुपालीने कधीकाळी एका गोठ्यात आसरा घेतला होता, यावर आपला विश्वासच बसणार नाही. मात्र हे सत्य आहे, आणि याबद्दल तिने स्वतःच सांगितले आहे. नुकतंच स्वप्नील जोशी यांच्या शेअर विथ स्वप्नील या कार्यक्रमामध्ये तिने हजेरी लावली होती. यामध्ये तिने आपल्या वाट्याला आलेलं दुःख, यातना, आणि संघर्ष याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
तिच्या भूतकाळातील बिकट परिस्थिती बद्दल ऐकत असताना अक्षरशः काळीज पिळवटून गेले. मूळची मुंबईची असणारी रुपालीच बालपण वरळीच्या बीडीडी चाळीतच गेलं. रूपातील शिक्षणाची खूप आवड होती आणि शिकून मोठं व्हावं अशी महत्वकांक्षा देखील होती. मात्र नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही.
रुपालीच्या काकाने ती नववीमध्ये असताना एका स्कीमच्या नावाखाली तिच्या वडिलांकडील सगळे पैसे नेले. तिच्या काकाला या स्कीममध्ये तर अटक झाली, पण रूपालीचं संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं. हातात असणारे सर्व पैसे संपून गेले आणि अन्नाची भ्रांत मग या परिस्थतीमध्ये तिला नववीतच आपलं शिक्षण सोडावं लागलं. आणि इथूनच तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ सुरु झाला.
या अतिगं’भीर परिस्थितीमध्ये तिच्या काकीने घर विकून टाकून, तिच्याकडे येऊन रहा असा सल्ला दिला. रुपालीच्या पूर्ण कुटुंबाला तो पटला. त्यांनी विश्वास ठेवला आणि आपलं रहातं घर विकलं. पण तिच्या काकीनेच त्यांना धोका दिला. धोक्याने त्यांचे सर्व पैसे घेते आणि त्यांना रपरपत्या पावसात संपूर्ण कुटुंबाला घराच्या बाहेर हाकलून दिल.
तिचे आई-वडील रुपाली आणि तिच्या लहानग्या भावाला घेऊन, तिथेच कुठेतरी रस्त्याच्या आडोश्याला आश्रयाला गेले. मुलं भिजू नयेत म्हणून आईने दोघांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती.याकाळात आपल्या लेकरांचे हाल बघून तिच्या आईला दोन वेळा हृ’दयवि’काराचा झटका येऊन गेला. अश्या वेळी तिच्या वडिलांच्या एका मित्रान रुपालीच्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या घरी नेलं.
मात्र त्यांचं कुटुंब देखील मोठं होत आणि त्यामुळे केवळ एकचं रात्र त्यांना तिथे आसरा मिळाला, आणि मग दुसऱ्या दिवशी त्या मित्राच्या ओळखीने एक छोटी पत्र्याची खोली भोसले कुटुंबियांना मिळाली. त्यामध्ये पूर्वी गुरे बांधली जात असे आणि त्या पत्र्याच्या भिंती असणाऱ्या घराला बरीच छिद्र पडलेली होती. या छिद्रातून नेहमीच लोकं आत डोकावून बघत.
त्यामुळे, रुपाली मध्यरात्री ३-३.३० वाजता उठून अंघोळ करत होती. अशी गं’भीर परिस्थती बघून, तिच्या भावाच्या मनात आ’त्मह’त्येचा विचार आला होता. आणि तो ऐकून रूपालीला प्र’चंड भी’ती वाटली होती. मात्र संघर्ष सोडायचा नाही, हे मनाशी ठाम होत. म्हणून तिने देखील छोटं काम पकडलं, तिला त्या कामातून महिन्याला अडीच तीन हजार रुपये मिळत होते.
त्यातूनच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. तिची इच्छा असून देखील शिक्षण घेता नाही आलं. म्हणून ती आपल्या भावाला हवं तेवढं शिक्षण घे असे म्हणते. सोबतच तिने आपल्या चाहत्यांना देखील जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा मोलाचा सल्ला दिला.