राज कुंद्रा प्रकरणात आले सई ताम्हणकरचे नाव ! स्पष्टीकरण देताना सई म्हणाली…

जवळपास माघील एका आठवड्यापासून सगळीकडेच, राज कुंद्रा यांच्याच नावाची चर्चा आहे. अ’श्लील सिनेमा निर्मिती केल्याप्रकरणामध्ये त्यांना मुंबई क्रा’ई’म ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. त्यासाठीचा पुढील तपास सध्या सुरु आहे.
दरम्यान, राज कुंद्रा प्रकरणाला रोजच एक वेगळं आणि नवीन वळणं मिळत आहे. सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये काही मोठे आणि दिग्गज नाव समोर येण्याचा कयास लावण्यात येत होता. मिळालेले व्हॅ’ट्सऍप चॅ’ट आणि इमेल मधून, या कंपनीसोबत अजून कोणाचे नाव पुढे येत आहे याबद्दल आता पो’लीस तपास करत आहेत.
तपासाचा भाग म्हणून, पो’लिसां’नी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या राहत्या घरावर धा’ड मा’रली होती. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमधून काही पुरावे सापडले असले तरीही, शिल्पा शेट्टीच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नाहीये. मात्र, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना समोरासमोर बसवून पो’लिसां’नी कसून चौ’कशी केली.
चौ’कशीदरम्यान शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर झाले आणि रडू कोसळले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामध्ये, माझ्या पतीने काहीही केलं नसून तो नि’र्दोष आहे, हेच शिल्पा वारंवार सांगत होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीने आपला अनुभव सांगत आपले मत व्यक्त केले आहेत.
राज कुंद्रा यांच्या हॉ’टशॉ’ट्स पडसाद मराठी चित्रपटसृष्टीवर देखील पडले असल्याचे समोर येत आहे. याच प्रकरणाबद्दल मराठी आणि आता हिंदी मधील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरला देखील विचारण्यात आले, तेव्हा तिने केलेल्या खुलास्याने सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. याच प्रकरणामध्ये अ’टक करण्यात आलेल्या गहना वसिष्ठच्या दाव्यामुळे सई ताम्हनकरचे नाव पुढे आले आहे.
गहनाने सांगितले होते की, ‘राज कुंद्राला अ’टक होण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. तेव्हा मला त्याच्या नवीन ‘बॉलिफेम’ या अॅप बद्दलची माहिती त्यांनी स्वतः दिली होती. या अॅपवर चॅट शो, रिअॅलिटी शो, फिचर फिल्म आणि म्युझिकल व्हिडियोंचा देखील समावेश होणार होता. याबद्दलच आमचं अगदी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये बोलणं झालं होतं.
या ऍपमध्ये कोणत्याही प्रकारचा अ’श्लील किंवा बो’ल्ड कंटेन्टचा समावेश होणार नव्हता. या अॅपवरील एका खास चित्रपटासाठी राजची मेव्हणी शमिता शेट्टी आणि दुसऱ्या एका चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर या दोघीना विचारण्यात आलं होतं.’ गहनाच्या या दाव्यावर आता सई ताम्हनकरच्या टीमकडून उत्तर आलं आहे.
त्यांनी हा दावा खोडून काढला आहे. राज कुंद्राच्या कोणत्याही सिनेमाची ऑफर किंवा त्याबद्दलची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सईच्या टीमने सांगितले आहे. सई एक अत्यंत हॉ’ट आणि बो’ल्ड अभिनेत्री आहे. तिने अनेक सिनेमामधून बो’ल्ड सिन देखील दिले आहेत.
मात्र अश्या कोणत्याही प्रकारांमध्ये ती अ’डकलेली नाहीये. राज कुंद्रा यांच्याशी कधीही तिचा सं’बंध आला असेल तर तोदेखील एखाद्या इव्हेंट किंवा कार्यक्रमापुरताच आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्टबद्दल चर्चा झालेली नसल्याचे, सईने सांगितले आहे.