‘रंग माझा वेगळा’ मधील सुपर डॅशिंग सौंदर्या इनामदारची बहीणही आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; ‘या’ मालिकेत दोघांनी केलंय काम…

‘रंग माझा वेगळा’ मधील सुपर डॅशिंग सौंदर्या इनामदारची बहीणही आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; ‘या’ मालिकेत दोघांनी केलंय काम…

चित्रपटसृष्टीमध्ये अनेकवेळा आपण पाहिलं आहे की, बहीण-भावाची किंवा बहिणीची जोडी सोबतच पदार्पण करते आणि भरगोस यश मिळवते. अश्या अनेक जोड्या आपण आपल्या मराठी सिनेसृष्टीमधे देखील पाहिल्या आहेत. मात्र अनेक वेळा, त्यापैकी एका कलाकाराला भरगोस लोकप्रियता मिळते आणि दुसऱ्याला मात्र त्याच्या तुलनेत कमी मिळते.

अश्या वेळी, त्या आपल्याला त्यांची ओळख खूप उशिरा होते. अश्याच एका जोडीबद्दल आपण बघू या. विशेष म्हणजे ही जोडी माघील कित्येक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आली आहे, मात्र त्या दोघी बहीण आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे. सध्या सुरु असलेल्या काही सुपरहिट मालिकांपैकी, स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सर्वच पात्र म्हणजेच कार्तिक, दीपा, सौंदर्या यांना प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळते आहे. मात्र सर्व नव्या चेहऱ्यांमध्ये देखील सर्वात हटके आणि दमदार भूमिका आहे सौंदर्या इनामदार यांची. अगदी डॅशिंग अश्या सौंदर्याची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकर अत्यंत उत्तम प्रकारे साकारत आहेत.

माघील अनेक वर्षांपासून हर्षदा खानविलकर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी अनेक पात्र, भूमिका रेखाटल्या आहेत, मात्र सौंदर्याची भूमिका काही खास आहे.मात्र, याच हर्षदा खानविलकर या एका अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे. काही मोजक्याचयाबद्दल लोकांना माहिती आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडे या हर्षदा खानविलकर यांची बहीण आहे.

अभिनेत्री मृणाल देशपांडे केवळ हर्षदाचीच नाही तर, अभिनेत्री समिधा गुरू हिची देखील थोरली बहिण आहे. आणि याबद्दल देखील बऱ्याच लोकांना माहित नाही. सध्या, समिधा गुरू कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारत आहे. मृणाल आणि समिधा या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत.

जर त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, पण हर्षदा त्यांची सख्खी बहीण नाहीये. हर्षदा खानविलकर या मृणाल देशपांडे यांची मानलेली बहिण आहे. पण म्हणतात ना, रक्ताच्या नात्यापेक्षा मानाचं नातं जास्त घट्ट असतं. अगदी तसेच या दोघींच्याही बाबतीत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही दिवसांपूर्वी मृणाल देशपांडेने एक फोटो शेअर करत पोस्ट केली होती.

त्या फोटोमध्ये, ती बहिण हर्षदा खानविलकरसोबत दिसत आहे. नुकताच अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा वाढदिवस साजरा झाला. त्याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मात्र, हर्षदाचा यंदाचा वाढदिवस मृणाल आणि हर्षदा या दोघी बहिणींनी एकत्रित साजरा केला. ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत या दोघीनी एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या दरम्यान हर्षदा व मृणाल या दोघींमध्ये, स्पेशल नाते बनत गेले. दिवसांबरोबर हे नातं अधिकच घट्ट होत गेले आणि त्याचे रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झाले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *