‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार ‘या’ नवीन पात्राची एन्ट्री, ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका..

आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये मालिका सर्वांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या दरम्यान याच मालिकांनी प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन केले. याच काळात मालिकांचे क्रेझ पुन्हा कमालीचे वाढले.
खास करुन मराठी मालिकांचे. अनेक मालिकांनी लोकरीप्रियतेची शिखर गाठली. अशीच एक अत्यंत ;लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. या मालिकेने काहीच दिवसांमध्ये आपला भला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेच्या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे.
दीपा आणि कार्तिक या दोघांची जोडी तर चाहत्यांच्या मनाला भावलीच मात्र, आता सौंदर्य आणि दीपा या सासू-सुनेच्या जोडीचे देखील बरेच चाहते झाले आहे. सध्या या मालिकेचे कथानक अतिशय रंजक वळणावर आहे. मालिकेमध्ये कार्तिकने आपल्या आईला म्हणजेच सौंदर्याला आपण कधीही बाबा होऊ शकत नसल्याचे सत्य सांगितले आहे.
त्यानंतर दीपाची प्रसूती होते, आणि ती गोंडस जुळ्या मुलींना जन्म देते. श्वेता अद्यापही आई बनलेली नाहीये, आणि आता सौंदर्या सर्व संपत्ती त्या मुलींच्या नावे करू शकते म्हणून तिने आदीच दीपाला वि’ष देखील दिले होते. तेव्हापासून आता थेट दीपा आणि तिच्या मुलींच्या जीवाला धो’का निर्माण झाला आहे. दीपाने दोन मुलींना जन्म दिला.
तेव्हा सौंदर्याने हे सत्य तिच्या पासून लपवून ठेवले आणि एक बाळ स्वतःजवळ ठेवले. एका बाळाचा मृ’त्यू झाला आहे असं, सौंदर्याने सगळ्यांना सांगितलं आहे. मात्र, दीपाला आपलं दुसरं बाळ जिवंत आहे हे समजले आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्राणांना धो’का आहे, कारण कोणत्याही क्षणी श्वेता अजून खालच्या पातळीला जाऊ शकते हे तिला समजतं.
या क’ठीण परि’स्थतीमध्ये दीपा आपल्या न’वजात बाळाला घेऊन, गुपचूप हॉस्पिटल मधून पळ काढते. तिला मदतीचे खूप जास्त गरज असतेच आणि ती मदत अश्विनीच्या रूपात दीपाला मिळते. अश्विनी दीपाला मोठ्या प्रेमाने आपल्या घरी घेऊन जाते. सख्ख्या बहिणीहून अधिक दीपाला माया लावते. तिच्या चिमुकलीची काळजी घेते.
तिचे हे सर्व प्रेम आणि आपुलकी बघून दीपा अक्षरशः भारावून जाते. आता पुढे दीपा तिच्याच कडे राहून आपल्या दुसरा बाळाचा सांभाळ करते, असं कथानक वळण घेणार आहे. दीपा आपल्या एका मुलीचा तर सौंदर्या दुसऱ्या मुलीचा सांभाळ करते. मात्र दीपाला आसरा दिलेल्या अश्विनीची भूमिका नक्की कोण साकारणार असा, प्रश्न पडला असेल.
तर वैशाली भोसले अश्विनीच्या भूमिकेत दिसणार आहे. वैशाली भोसलेने यापूर्वी अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलं आहे. चंद्र आहे साक्षीला, ब्रम्हांडनायक, तू माझा सांगाती अश्या सुपरहिट मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील तिने काम केलं आहे. आता अश्विनीच्या भूमिकेत ती रंग माझा वेगळा या मालिकेत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे.